अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी चिपळूण पूरग्रस्तांना केली 1 लाख रूपयांची  मदत…

[avatar]

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी चिपळूण पूरग्रस्तांना केली 1 लाख रूपयांची  मदत…

चिपळूण ( लक्ष्मण राजे)चिपळूण पुरग्रस्तांच्या मदती करीता बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्रसेवा दलाचे मुंबई कार्याध्यक्ष शरद कदम यांच्या कडे 1 लाखा रुपयांचा धनादेश दिला.तसेच त्यांनी महाड आणि चिपळूण येथील शेकडो लोकांना अन्नधान्य, तसेच महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन, व लहान मुलांसाठी बिस्किटे तसेच प्लास्टिकच्या चटईचे वाटप केले.यापुर्वी ही कोल्हापूर, सांगली येथील पुरग्रस्तांना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी  आर्थिक मदत केली आहे. तसेच ती मदत त्यांनी स्वतः पुरग्रस्तांची भेट घेऊन राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून केली होती.राष्ट्रसेवा दलाची अनेक पथक चिपळूण, महाड,व इतर पूरग्रस्त  परिसरात मदत कार्य करीत आहेत.राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते नुसतं अन्नधान्याचे वाटप न करता पुरग्रस्तांच्या घरातले गाळ चिखल काढणे, साफसफाई करणे,ही कामं पण करीत आहेत. तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यासाठी व इतर मदत कार्य करण्यासाठी चिपळूण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे तात्पुरते मदतकार्य केंद्र स्थापित केले आहे.तिथं राष्ट्रसेवा दल रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष व इतर पदाधिकारी तसेच समविचारी संस्था संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मदतीचं नियोजन आणि वाटप घरा-घरात पोहचवण्यासाठी कार्य करीत आहेत.तसेच मुंबई राष्ट्रसेवा दलाचे  कार्याध्यक्ष शरद कदम यांच्या नेतृत्वाखाली युवराज मोहिते,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार, निसार अली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार विजय मोहिते, व इतर सदस्यांचे पथक मुंबईहुन मदतीचे साहित्य घेऊन चिपळूणला रवाना झाले आहेत. राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते गेल्या 5 दिवसापासून चिपळूण येथे मुंबईकरांच्या वतीने मदत कार्यात सहभागी झाले आहेत.
चौकट…
उर्मिला मातोंडकर यांनी स्वतः पूरग्रस्त सुरेश गोविंद शिंदे यांची माहिती मिळताच त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना अन्नधान्य व आर्थिक मदत केली.तसेच त्यांचे गाऱ्हाणे ऐकूण उर्मिला मातोंडकर यांना अश्रू अनावर झाले. यापुढे ही पुरग्रस्तांना शक्य होईल तेवढी मदत करण्यात येईल असे आश्वासन उर्मिला मातोंडकर यांनी शिंदे कुटुंबीयांना दिले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close