उपप्रादेशिक परिवहन आणि वाहतूक पोलिसांचे रास्ता सुरक्षा अभियान… 

[avatar]

उपप्रादेशिक परिवहन आणि वाहतूक पोलिसांचे रास्ता सुरक्षा अभियान… 

Jsw कंपनीत मार्गदर्शन तसेच नेत्रचिकित्सा शिबीर संपन्न

पेण (किरण बांंधणकर)11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीत वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पेण प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक शाखा रायगड यांच्या माध्यमातून तसेच jsw स्टील कंपनीच्या सहकार्याने jsw स्टील कंपनीमध्ये रास्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आला. या अभियानांतर्गत रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना आपले डोळे सुरक्षित असावेत यासाठी नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर अभियानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने उपस्थितांना वाहतुकीच्या नियमांबाबतची पत्रके वाटण्यात आली.
यावेळी या अभियानाला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप कित्ते, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे, जी. एम. सिक्युरिटी कर्नल एच बक्षी, परिवहन कार्यालयाचे अधिकारी मंगेश नाईक, समीर चव्हाण, रोहित जाधव, सुजित कुमार सिंह यांसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी जेएसएम कॉलेज अलिबाग यांच्यामार्फत वाहचालकाने कशाप्रकारे आपली आणि प्रवाशांची काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शनपर पथनाट्य केले.
या अभियानाबाबत बोलताना वाढत्या अपघातांना आळा बसावा, अपघात कमी व्हावे, जीविताची तसेच मालमत्तेची हनी कमी व्हावी त्याचप्रमाणे वेगमर्यादा, वयोमर्यादा, हेल्मेटचा वापर आदी गोष्टींचे मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हे अभियान वर्षाच्या पहिल्याच महिन्यात राबविण्यात येत असल्याचे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे यांनी सांगितले

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close