एकतेची शिकवण सरदार वल्लभभाई पटेलांनीच दिली—प्रा.राजा जगताप…

[avatar]

एकतेची शिकवण सरदार वल्लभभाई पटेलांनीच दिली-प्रा.राजा जगताप…

उस्मानाबाद (विशेष प्रतिनिधी)भारताला स्वातंञ्य मिळाल्याच्या नंतर विविध संस्थानात विभागलेल्या देशाला एकञ करण्याचे काम आव्हानात्मक होते प्रत्येक संस्थानांची भाषा,प्रदेश,तेथील सांस्कृतिक जीवन वेगळे होते. ५६२संस्थानाचे वीलगीकरन तत्कालीन गृहमंञी व पहिले उपप्रधान सरदार वल्लभभाई पटेलांनी करून देशात राषट्रीय एकात्मता घडवली व एकतेची शिकवण त्यांनीच दिले असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात ३१ ऑक्टोबर रोजी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना प्रा.राजा जगताप यांनी केले आहे.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख होते.तसेच प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रतिमेचे पुजन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले.हा कार्यक्रम महाविद्यालयातील राषट्रीय सेवा योजना विभागाने एकता दिवस म्हणून साजरा केला.पुढे बोलतांना प्रा.जगताप म्हणाले की,सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशामधील शेतक—यावर होणा—या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गुजरातमधील खेडा येथे आंदोलन करून शेतक—यांचे नेतृत्व केले व इंग्रजांनाही आपला कणखरपणा दाखवला. बार्डोली सत्याग्रहातही त्यांनी म.गांधीजींच्या सहाय्याने आंदोलन यशस्वी केले होते.तसेच देशाचे गृहमंञी म्हणून त्यांनी पार पाडलेली जबाबदारी अजरामर ठरली आहे.आपण शिक्षकांनी देशाची अखंडता,एकता टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत असे त्यांनी आवाहन केले.यावेळी प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.डी.एम.शिंदे,उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी,प्रा.माधव उगीले,प्रा.स्वाती बैनवाड,आदी उपस्थित होते.सूञसंचालन व आभार प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर यांनी मानले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close