चिपळूणच्या सुपुत्रांने आफ्रीकेत केला अभिनेते संजय दत्त यांचा सत्कार;नगरसेवक शारीक चौगुले यांच्या टांझानिया मधील कामगिरीचे संजय दत्त यांनी केले कौतुक…

[avatar]
चिपळूणच्या सुपुत्रांने आफ्रीकेत केला अभिनेते संजय दत्त यांचा सत्कार;नगरसेवक शारीक चौगुले यांच्या टांझानिया मधील कामगिरीचे संजय दत्त यांनी केले कौतुक…
चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूणचा सुपुत्र असलेला आणि सद्या आफ्रीका देशातील टांझानिया डारीसलाम महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक शारीक चौगुले यांचे येथील कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांनी कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.
आफ्रीकेतील टांझानिया राज्यांतील डारीसलाम महानगरपालिकेच्या वतीने पालिकेत पर्यटन मंत्रालयाच्या वतीने पर्यटन वेबसाईट उदघाटन आणि विकास कामाचा शुभारंभ कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून सिनेअभिनेते संजय दत्त यांना निमंत्रित करण्यात आले होते.या कार्यक्रमाला टांझानिया राज्याचे  माहिती, संस्कृती, कला आणि क्रीडा मंत्री इंनोसेन्ट बाशुंगवा,संजय दत्त,नगरसेवक शारीक चौगुले, टांझानिया फिल्म इंडस्ट्रीज चे चेअरमन नूसांट बाशिंगा ,शुकगी डारी सलाम आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.प्रास्ताविक मध्ये बोलतांना नगरसेवक शारीक चोगुले यांचा बुशनगी यांनी पूर्वीचे भारतवासी असल्याचा  विशेष उल्लेख केला होता या वरून अभिनेते संजय दत्त यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात शारीक चौगुले यांचा विशेष उल्लेख करून प्रभागातील कामाबाबत कौतुक केले .
चिपळूण शहरातील गोवळकोट येथील माजी नगरसेवक स्वर्गीय लियाकत चोगुले यांचे सुपुत्र आहेत ते काही वर्षे उद्योग व्यवसाय निमित्त आफ्रीकेतील टांझानिया देशात वास्तव्याला आहेत दोन वर्षांपूर्वी डारीसलाम महानरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत क्यूकोनी प्रभागातून  शारीक चौगुले विक्रमी मताधिक्याने विजयी झाले होते
शारीक चौगुले जरी वास्तव्याला टांझानियाला असले तरी चिपळूणवर त्यांचे प्रेम कायम आहे या कार्यक्रमात अभिनेते संजय दत्त यांचा शारीक चोगुले यांनी सत्कार केला.या कार्यक्रमाला डारीसलाम महानगर पालिकेचे, पर्यटन महामंडळ टांझानियाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close