पंढरीत कार्तिकवारी आणि वादळी वारे पावसाचे थैमान….

[avatar]

पंढरीत कार्तिकवारी आणि वादळी वारे पावसाचे थैमान….

पंढरपूर(विशेष प्रतिनिधी)- अनेक समस्यांना तोंड देत दोन वर्षातून पंढरीत कार्तिकवारी भरत असताना दसमीच्या रात्री पंढरीत पावसाने थैमान घातले.पंढरीत वारी करीता जमलेल्या वारकरी वर्गाची दानादान उडाली.एस.टी.संपाच्या छायेत पंढरीची कार्तिक वारी भरत असतानाच,खाजगी,वैयक्तिक वाहनानी दिंड्या,वारकरी पंढरीच्या दिशेने धाव घेत असतानाच अवकाळी वादळी वारे सह पावसाने पंढरीला झोडपून काढले.पंढरी वारकरी वर्गाने ठिक ठिकाणी बांधलेल्या तंबूची खूपच दैना करून टाकली.छोटे मोठे व्यापारी कार्तिकी वारी मनासाऱखी भरली नसल्याची खंत व्यक्त करीत होते. आपल्या कर्ज काढून भरलेल्या वस्तूंची विक्री कशी होईल ? या विचाराने हतबल झाले. यात खेळणी,प्रासादायिक वस्तू, फोटो, कपडे वगैरे वगैरे वस्तूंच्या दुकानाचा समावेश होत आहे.तसेच वारकरी वर्गानेही दुकानाकडे पाठ फिरविल्याने दुकानदार चिंतेत आहेत. पावसाने अचानक येऊन व्यापारी वर्गाची समस्या आणखी वाढविली. अशी माहिती भारत कवितके पंढरपूर यांनी दिली.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close