श्री संत नामदेव महाराज यांच्या ७५१ व्या जयंतीनिमित्त तब्बल ७५५१ किलो पेक्षा जास्त धान्यवाटप…

[avatar]

श्री संत नामदेव महाराज यांच्या ७५१ व्या जयंतीनिमित्त तब्बल ७५५१ किलो पेक्षा जास्त धान्यवाटप…

पुणे (लक्ष्मण राजे)नामदेव समाजोन्नती परिषद, शाखा पुणे शहर यांच्या वतीने १९ सामाजिक संस्थांना धान्यरुपी मदत नुकतीच करण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य जनते बरोबर सामाजिक संस्थांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. नेमकी हीच गरज ओळखून नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेने धान्य वाटप हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम हाती घेत वंचित, आदिवासी, अंध, अपंग, निराधार, निराश्रित, दगडखान, वारकरी अशा तब्बल १९ सामाजिक संस्थांना ७५५१ किलो पेक्षा जास्त धान्य वाटप करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५१ व्या जयंतीच्या वर्षानिमित्त पूर्व संध्येला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते , यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई, माजी आमदार प्रकाश देवळे, नगरसेवक रवींद्र धंगेकर, स्थायी समिती अध्यक्ष मा. हेमंत रासणे, ना.स.प. अध्यक्ष संजीव तुपसाखरे, ना.स.प. पुणे शहर अध्यक्ष संदीप लचके, पुणे विभागीय उपाध्यक्ष श्री संजय नेवासकर मुख्य विश्वस्त रामभाऊ मेटे, केशवराज संस्था पंढरपूरचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, माजी मुख्य विश्वस्त तु. पां. मिरजकर, माजी नगरसेवक कैलास नेवासकर, अनुप सुधीर पिसे प्रमुख उपस्थिती होते.ना.स.प. पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे, उपाध्यक्ष रणजित माळवदे, प्रदीप खोले,  कुंदन गोरटे, व सोमनाथ मेटे , उपक्रम संपर्क प्रमुख प्रशांत सातपुते, विजय कालेकर यांची   संकल्पनेतून आपले घर, एकलव्य न्यास, लुई ब्रेल आणि अपंग कल्याणकरी संस्था, संतुलन पाषाण, ममता फाउंडेशन, वंचित विकास, अनिकेत सेवाभावी संस्था, जीवन ज्योत मंडळ, संस्कार प्रतिष्ठान मतिमंद मुलींची निवासी शाळा, प्रा फाउंडेशन माहेर संस्था, साई गुरु सेवा संस्था, सोफोश श्रीवत्स, जीवन वर्धिनी संचलित मतिमंद विद्यालय, सार्थक अनाथालय, माया केअर सेंटर, सेवाधाम संस्था डोनजे, गुरुकृपा वारकरी विद्यार्थी सेवा ट्रस्ट भोर, पारधी समाज बीड या संस्थांना मदत करण्यात आली. यावेळी भिक्षेकरूचे डाॅक्टर सौ. व श्री अभिजीत सोनावणे याचा मानपत्र, शाल,  श्रीफळ व फळाची टोकरी देवून विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. संतांचे हे विचार आजच्या तरुणांपर्यंत पोहोचले पाहिजेत, तर भरकटणारे तरुण त्यांचा आदर्श समोर ठेऊन चांगले काम करू शकतील. त्याकरिता शालेय अभ्यासक्रमात संतांचे धडे विद्यार्थ्यांना दिले पाहिजेत, असे  प्रतिपादन डाॅ. मिलिंद भोई यांनी केले.कार्यक्रमाचे संयोजन अँड. ज्ञानेश्वर पाटसकर, श्री. रमेश हिरवे, सुभाष पांढरकामे, अक्षय मांढरे, दुर्गेश खुर्द, राहुल सुपेकर, अक्षय लचके, रजनीकांत निखळ यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  आशिष जरड, स्वागत मुख्य समन्वयक प्रशांत सातपुते, प्रस्तावना अध्यक्ष संदिप लचके तर आभार सचिव सुभाष मुळे यांनी मानले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close