जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत सिद्धेश कातकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी

[avatar]

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत सिद्धेश कातकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी
कोलाड (श्याम लोखंडे ) वनविभाग अलिबाग परिक्षेत्र नागोठणे यांच्या मार्फत वन्यजीव सप्ताह २०१९च्या निमित्ताने रायगड जिल्हा स्थरीय हस्तचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेतील विषय ‘ मी निसर्गात पाहिलेला पक्षी, या विषयावर माध्यमिक विद्यालयाच्या गटातून आदिवासी समाजाचा विद्यार्थी कु.सिद्धेस दिनेश कातकरी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
श्रीमती गिता द.तटकरे माध्यमिक विद्यालय कानसई येथे वन्यजीव सप्ताह निमित्त वनविभाग अलिबाग परीक्षेत्र नागोठणे मार्फत ही जिल्हा स्थरीय स्पर्धा घेण्यात आली यावेळी वनखात्याचे परिमंडळ वनअधिकारी एस. आर.रणवरे यांच्या शुभहस्ते सिद्धेश दिनेश कातकरी याला प्रशस्तीपत्र,फुलगुच्छ व एक बेलाचे वृक्षारोप देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी वनविभाग परिमंडळ कानसई विभागातील अधिकारी सांबरे, धुळे, गौरी मॅडम,शाळेचे मुख्याध्यापक वाघ सर, पालक संघाचे उपाध्यक्ष दिनेश कातकरी, पाटील मॅडम,मढवी मदम मॅडम,गजभार सर, देशमुख सर, विद्यालयाचे कर्मचारी अजित जाधव व असंख्य विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करतांना एस आर रणवरे यांनी सांगितले कि वनखात्याने विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी निर्माण करुन दिली आहे.या चित्रकला स्पर्धेमुळे आपल्या मुक्या पक्ष्यांचे महत्व समजण्यास मदत होईल व परिणामी निसर्गाचे संगोपन होईल.उपस्थितांनी सिद्धेश कातकरी याचे अभिनंदन केले कार्यक्रमात शेवटी गजभार सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close