पै.नंदकुमार यादव यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड….

[avatar]

पै.नंदकुमार यादव यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड….

वाठार स्टेशन (लक्ष्मण राजे)कोरेगाव तालुक्यातील करंजखोप गावचे सुपुत्र असणारे पै. नंदकुमार यादव यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड झाली. पै.नंदकुमार यादव हे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय मानले जातात, गेली कित्येक वर्षे झाली पै.नंदकुमार यादव हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत त्याचप्रमाणे गोरगरिबांसाठी एक हाकेला धावणारा सच्चा माणूस म्हणून पै.नंदकुमार यादव यांच्याकडे पाहिले जाते. ते भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने त्यांची ही ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाल्याचे समजते. पै.नंदकुमार यादव यांच्या प्रदेश सचिव निवडीमुळे भारतीय जनता पक्षात व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पै.नंदकुमार यादव यांच्या निवडीबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व भारतीय जनता पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले.अशी माहिती मुकुंदराज काकडे यांनी दिली.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close