पराग मेलडीज प्रस्तुत श्रद्धा गायकवाड व पराग क्षीरसागर  आयोजित बॉलिवूड हंगामा या सुरेल संगीत मैफलीस प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

[avatar]
पराग मेलडीज प्रस्तुत श्रद्धा गायकवाड व पराग क्षीरसागर  आयोजित बॉलिवूड हंगामा या सुरेल संगीत मैफलीस प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
पुणे(लक्ष्मण राजे) पराग मेलडीज प्रस्तुत पराग क्षीरसागर व श्रद्धा गायकवाड आयोजित बॉलिवूड हंगामा  या सुरेल संगीत मैफलीचे आयोजन 26 नोव्हेंबर 2021रोजी  पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर व नगरसेवक दीपक मानकर,ज्ञानश्री फाउंडेशनचे अध्यक्ष जोहेर चुनावाला उपस्थित होते .तसेच याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या  नीता कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर सरचिटणीस अर्चना चंदनशिवे, देव माणूस फेम अभिनेत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साहित्य कला व संस्कृती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा पुष्पा चौधरी, दै.पुढारी च्या माधुरी घुले आदी मान्यवर उपस्थित होते.  या कार्यक्रमात पराग क्षीरसागर, श्रद्धा गायकवाड, पुष्पा चौधरी,अनुजा पंडित,सुनील हळगावकर, वासुदेव भारद्वाज, ज्ञानेश वर्मा, पल्लवी कुलकर्णी, अश्विनी सरदेशमुख, संगीता देशपांडे  या गायक-गायिकांनी आपली सुमधुर गीते सादर केली. विशेषत: गुलाबी आखे,  तेरी बिंदिया रे ,ओम शांती ओम ,कभी कभी मेरे दिल में, हसता हुआ नूरानी चेहरा ओ हंसिनी, प्यार का तोफा तेरा, लागा चुनरी मे दाग, छेडो ना मेरी जुल्फे, थोडी सी जो पी ली है, चूप गये सारे नजारे, के पग घुंगरू अशी एका पेक्षा एक सरस, सदाबहार गाणी सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.तसेच गायक-गायिकांनी गीते गाऊन या कार्यक्रमात रंगत आणली आणि मोठ्याप्रमाणात उपस्थित असलेल्या संगीत प्रेमीरसिकांना मंत्रमुग्ध केले.तसेच श्रद्धा गायकवाड ,सुनिल हळगांवकर यांनी खास शास्त्रीय संगीतातली पिया तोसे नैना, कैसे समझांऊ बडे नासमझ, गाणी देखिल उत्तम गायकीने सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमिता क्षीरसागर यांनी केले. या कार्यक्रमासाठी अमन सय्यद, हर्षद गणबोटे, ऋतुराज कोरे, हार्दिक रावळ,सईद खान,यांनी संगीत साथ  केली होती. तसेच सर्व videography, photography इ.व्यवस्था विक्रम क्रिएशन्स यांनी उत्तम रीत्या केली होती. मल्लेश गंगराय यांनी ध्वनी संयोजन केले होते. या कार्यक्रमास पुण्यातील प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स इन चे सर्व शासकीय नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close