“शरद पवार, माझ्या शब्दात” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न…

[avatar]

“शरद पवार, माझ्या शब्दात” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न…

रसायनी (राकेश खराडे)पुणे येथील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित  “शरद पवार, माझ्या शब्दात” या शीर्षकाखाली भव्य अशा राज्यस्तरीय लेख व निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक व बक्षीस पात्र असलेल्या ३२ निबंध व लेखाचे संकलन करून शरद पवार माझ्या शब्दात”  या पुस्तकाचे मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार भाषांमध्ये भाषांतर करून पुस्तकाची निर्मिती करण्यात आली.
हा पुस्तक प्रकाशन सोहळा पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्या उपस्थितीत नेहरू सेंटर वरळी मुबंई येथे संपन्न झाला.या कार्यक्रमात शरद पवार यांना आगळे वेगळे स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले.या प्रकाशन सोहळ्या नंतर विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील , खा. सुप्रिया सुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार बंड, संदीप राक्षे, विवेक थिटे , अच्युत कुलकर्णी, सुशील बोरडे , प्रा.डॉ. सुशील गावंडे , नितिन गावंडे, आदी मान्यवर तसेच सामाजिक राजकीय सांस्कृतिक अध्यात्मिक वैद्यकीय क्षेत्रातील अनेक व्यक्ती उपस्थित होत्या.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close