राज्यपाल सन्मानित  महाराष्ट्राचे  ब्रँड अँबेसिडर डॉ. मनिलाल शिंपी यांना नागपूर येथे ” जीवन गौरव २०२१ ” पुरस्कार प्रदान…

[avatar]

राज्यपाल सन्मानित  महाराष्ट्राचे  ब्रँड अँबेसिडर डॉ. मनिलाल शिंपी यांना नागपूर येथे ” जीवन गौरव २०२१ ” पुरस्कार प्रदान…

कल्याण:(लक्ष्मण राजे)आर.एस.पी  कल्याण,ठाणे यूनिट चे कमांडर डॉ. श्री. मनिलाल रतिलाल शिंपी यांना नुकताच महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन भारत ओडिसा भुवनेश्वर यूनिवरसीटी यांनी महाराष्ट्राचे  राजदुत (ब्रँड अँबेसिडर) म्हणून नियुक्ति केल्या बद्दल त्यांचा  राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्माननीय श्री. भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभ हस्ते  स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आल्यानंतर या  सन्मानाची दखल घेऊन केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी दिल्ली यांच्या वतीने १० डिसेंबर २०२१ रोजी मानव अधिकार दिवसाचे औचित्य साधून  महाराष्ट्र राष्ट्रभाषा पुणे नागपूर विभाग श्री साई सभागृह येथे मा.श्री. अभिजित देशमुख न्यायाधीश नागपूर, मा.श्री.संजय पांडे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर, मा.श्री. दिपक कदम चित्रपट निर्माते मुंबई ,गाव वाले गोत्यात १५ लाख खात्यात या मराठी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री
 सौ.अश्विनी चंद्रकापुरे ,मा. ब्रह्मकुमारी मनीषा दीदी, केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी- दिल्ली चे संस्थापक अध्यक्ष डॉ.मिलिद दहीवले यांच्या शुभहस्ते  व दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सचिव डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील, स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण अध्यक्ष  डॉ.श्री. दिनेश भाई ठक्कर यांच्या  खास उपस्थितित आर एस पी कल्याण-ठाणे युनिटचे कमांडर तथा महाराष्ट्र राज्याचे राजदुत  (ब्रँड अँबेसिडर) डॉ.श्री. मनिलाल रतिलाल शिंपी यांचा जीवन गौरव २०२१ या पुरस्काराने सन्मानपूर्वक सन्मान करण्यात् आला. त्याबद्दल त्यांचे  दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून  संपादक डॉ. श्री. किशोर बळीराम पाटील , आर एस पी  महाराष्ट्र राज्याचे  महासमादेशक  डॉ. श्री. अरविंद देशमुख, कल्याण,ठाणे यूनिट आर. एस्  पी, अधिकारी, स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश भाई ठक्कर, जेजस ईज लाईफ फाउंडेशन उल्हासनगर यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close