वाढत्या ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल तालुका पोलिसांची धडक कारवाई….

[avatar]

वाढत्या ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल तालुका पोलिसांची धडक कारवाई….

पनवेल (संजय कदम)वाढत्या ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी पनवेल तालुका पोलिसांनी त्यांच्या हद्दीमध्ये धडक मोहिम राबवून कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी कारवाई सुरूवात केली आहे.
त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या हद्दीमध्ये विविध पथके स्थापन केली आहेत. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत हॉटेल व्यवस्थापन, पान टपर्‍या, चायनिज गाड्या आदींची विक्री करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच मास्क न घालणे, जास्त गर्दीचे लोक जमविणे, क्रिकेट सामने भरविणे यांच्या विरोधात सुद्धा भादवी कलम 188 अन्वये कारवाई केली आहे.
कोट…
नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेश व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कारवाईचा बडगा उगारावा लागेल वपोनि रवींद्र दौंडकर…

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close