लोणेरे येथे आमदार भरतशेठ गोगावले चषकाचे आयोजन….

[avatar]

लोणेरे येथे आमदार भरतशेठ गोगावले चषकाचे आयोजन….

माणगांव तालुक्यातील   लोणेरे गोरेगांव ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि उद्योजक मा सिताराम शेट उभारे  आयोजित  मा आमदार भरतशेट गोगावले  यांच्या मतदार संघातील मानाचा चषक म्हणून ओळखला जाणाऱ्या आमदार चषक 2022 मध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंचे कौशल्य पणाला लागले असून आता कोणता संघ बाजी मारून आमदार चषकाचा किताब मिळवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  28 फेब्रुवारी  पासून 1,2,3 मार्च पर्यंत  लोणेरे गोरेगांव ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंबर्ले  येथील मैदानावर ग्रामीण भागातील सर्वच 16 संघ  असोसिएशनचे पॅकर 8 संघ आणि ओपनचे 8 संघ आपला प्रतिभावान खेळ दाखवून संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना आपल्या  दिसणार आहेत. लोकप्रिय आमदार भरतशेट गोगावले   यांच्या नावे असलेल्या आमदार चषक 2022  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे  असोसिएशनचे उपाध्यक्ष  प्रमोद करकरे यांनी सांगितले ..
या आमदार चषक 2022  स्पर्धेत 32 संघांनी प्रवेश घेतला असून दररोज 8 सामने खेळविण्यात  येणार आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक  50 हजार व चषक, द्वितीय 30 हजार व चषक, तृतीय  20 हजार व चषक आणि  चतुर्थ 10 हजार व चषक तसेच मॅन ऑफ द सिरीज  उत्कृष्ठ फलंदाज व गोलंदाज , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक  अशी  भरघोस पारितोषिके  ठेवण्यात आलेली आहेत. आमदार चषकाच्या  आयोजना मुळे माणगांव तालुक्यातील ग्रामीण भागात क्रिकेट खेळणारे अनेक उत्कृष्ट व अष्टपैलू खेळाडू असून या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रतिभावान व नवोदित खेळाडूंना आपला खेळ दाखविण्याची संधी प्राप्त होत असते म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया  आयोजक असोसिएशनचे  सेक्रेटरी नयन उंडेरे  यांनी दिली आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close