निरुपणकार सचिनदादा धर्मांधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल, श्री सदस्यांत उत्साह….

[avatar]

निरुपणकार सचिनदादा धर्मांधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल, श्री सदस्यांत उत्साह….

रसायनी (राकेश खराडे)रायगड भूषण निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटकडून बॅकाॅक येथे मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आल्याने श्री समर्थ दासभक्तांत उत्साहाचे वातावरण आहे.
  या कार्यक्रमाप्रसंगी थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी उपस्थित होते. सचिन धर्माधिकारी यांना डाॅक्टरेट पदवी व आंतरराष्ट्रीय मानाचा पुरस्कार प्रदान होताच महाराष्ट्रभर श्री सदस्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला.
     रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील कुटुंब  धर्माधिकारी कुटुंबियांनी गेली ७५ वर्षे केलेल्या आध्यात्मिक- सामाजिक कार्यामुळे या कुटुंबातील सलग तीन पिढ्यांनी मानद डॉक्टरेट पदवी मिळवण्याची ऐतिहासिक हॅट्ट्रिक साधली आहे.सचिनदादा धर्माधिकारी हे धर्माधिकारी कुटुंबातील  तिसऱ्या पिढीचे नायक आहेत.
या कार्यक्रमात “‘ पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी “‘ यांना ‘Living Legend’ म्हणून गौरवण्यात आले.
धर्माधिकारी या कुटुंबातील सलग तीन पिढ्यांनी मानद डॉक्टरेट पदवी मिळवण्याची ऐतिहासिक हॅट्ट्रिक साधली आहे.
 जगभरातील कोट्यवधी श्रीसदस्यांना श्रवण- मनन- निजध्यासाच्या माध्यमातून सुख- शांती- समाधान मिळवून देण्याचं महान कार्य करणाऱ्या या धर्माधिकारी कुटुंबातील तिन्ही पिढ्यांना  श्रीसदस्यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात आदर दिला जात आहे.रायगड वासियांसाठी हा मानाचा मुजरा असल्याचे नागरिक सांगत आहेत.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close