महागाईने उच्चांक गाठला किराणा सामानाच्या किंमती कडाडल्या  दुप्पट भाव वाढल्याने एकच संताप,रशिया युक्रेनचा युद्ध सर्वसामान्यांच्या जीवनावर,खाद्यतेलासह किराणा सामान महागले….

[avatar]
महागाईने उच्चांक गाठला किराणा सामानाच्या किंमती कडाडल्या  दुप्पट भाव वाढल्याने एकच संताप,रशिया युक्रेनचा युद्ध सर्वसामान्यांच्या जीवनावर,खाद्यतेलासह किराणा सामान महागले….
कोलाड (श्याम लोखंडे ) बाजारात आता सर्वच वस्तूंच्या किंमतीत पुन्हा झपाट्याने दुप्पट भाव वाढले  त्यामुळे आता खाद्यपदार्थांच्या किंमती पुन्हा गगनाला भिडल्याने सर्वत्र ग्राहक वर्गात एकच संतापाची लाट पसरली तर गरिबांवर पुन्हा महागाईची व चढ्या भावाची टांगती तलवार असल्याने सर्वत्र एकच संताप पहावयास मिळत आहे तर रशिया युक्रेनचा युद्ध आता भारतातील गोर गरीब जनतेच्या जीवनावर बेतला आहे  .
देशासह राज्यात गेली तीन वर्षात अनेक संकट आली त्यावर मात करत करत नागरिकांना विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येतो ना येतो त्यात अधिक महागाईचा धसका आदी कोरोनाचा कहर त्यात चक्री व तौक्ते वादळ महापूर असे अनेक संकट सर्वसामान्यांच्या अखेर जीवावर वेतला कोरोना काळात गरिबांना घरपोच शासनासह विविध सामाजिक संस्था यांच्या सहकार्यातून यांनी किराणा समान जीवनावश्यक वस्तू पुरविल्या मात्र त्याच जीवणाकश्यक वस्तूंचे भाव आता गगनाला भिडले त्यामुळे बाजारात किराणा सामान खरेदीसाठी येत असलेल्या ग्राहक वर्गात मात्र एकच संताप व्यक्त केला जात असून खाद्यतेल जीवनावश्यक वस्तू किराणा दरात वाढ पुन्हा भरमसाठ दरवाढ झाल्याने यावर कोणाचे नियंत्रण आहे हे मात्र गुलदस्त्यात मात्र सर्वसामान्य माणसांची होणारी लूट ही भरमसाठ महागाई गोर गरिबांच्या आता अधिक विवावर वेतली आहे .
महागाईने सर्वांचेच कंबरडे मोडले कोरोना काळात काही व्यवसाईकांनी चढा भावाने समान विक्री केले त्यात आता अधिकच भरमसाठ किंमती वाढल्याने किचनमध्ये महिलांना काही सुचेना घरात महिन्याला कमाईचा येणार एक रुपया आणि खर्च होणार दोन रुपये त्यामुळे हात मजुरी आणि मोल मजुरी करणारांची चांगलीच गोची भाव दरवाढीमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याचे संकेत मिळत आहेत घरात गॅस कनेक्शन त्यामुळे घासलेट मिळत नाही गॅस बाटला परवडत नाही त्यात देखील दरवाढ अधिक ट्रान्सपोर्ट खर्च किराणा सामानात कडधान्य ही महागले तेल डाळी मीठ मसाला साखर चाहा सह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत तसेच हात मजूर काम करणारे गवंडी सुतार बेलदार विद्युत रोषणाई चे काम करणारे कामगार वर्ग यांच्या देखील सामानात भरमसाठ दरवाढ झाली त्यामुळे जीवन जगावे की मरावे अशी अवस्था सर्वसामान्य जनतेची झाली आहे.
सातत्याने होणारी महागाई भाववाढ दरवाढीवर नियंत्रण कोणाचे कोणत्या मालाची किती किंमत याचे काही गणित नाही मनाला वाटेल तो भाव पटलं तर घ्या नाहीतर जा त्यात त्यात आज रोख उद्या उधारी असे फलक साऱ्याच दुकानात ठळक अक्षरांमध्ये लिहिले गेले आहेत मात्र मालाच्या खऱ्या किंमती का लिहिल्या जात नाहीत असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे दररोज होत असलेली दरवाढ त्यामुले कुटूंबाचा आर्थिक खांब दिवसंदिवस ढासळत आहे घर चावले मुलांचा शिक्षणाचा बोजा त्यामुले त्यामुळे जीवन कसे जगावे अशी वेळ आता ग्राहक वर्गावर येऊन ठेपली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सर्वच बाबतीत बाजारात सामान खरेदीसाठी येणाऱ्या नागरिक ग्राहक वर्गाची पंचायत होत असतांना दिसत आहे,
देशातील केंद्र सरकार सह नेत्यांचे लक्ष इतर राज्यातील निवडणुका जिंकण्यासाठी तर महाराष्ट्रात रशिया आणि युक्रेन युध्दाच्या नावाखाली सर्वच व्यापारी लोकांनी सर्वसामान्य जनतेला लुटण्याचा सपाटा लावला आहे मनमानी पद्धतीने सर्व तेलाच्या किंमती मध्ये मनाने दरवाढ व चढा भाव करत आहेत युद्धामुळे जर महागाई वाढत असेल तर शेतकरी बांधवांच्या प्रत्येक शेत मालाला ही दर द्यावा फक्त व्यापारी लोकांच्या मालाला भाव वाढले जातात हे आता चालणार नाही शेतकरी जगला तर देश जगेल  गरीब दुबळा बळीराजा म्हणून त्याचा बळी देऊ नका म्हणजे झालं. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या व्यापाऱ्यांवर कठोरपणे समज द्यावी गरीबांना सहकार्य करावे अशी माफक अपेक्षा आहे .
…..सामाजिक कार्यकर्ते डॉ मंगेश सानप

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close