सायबर क्राईमबद्दल जनजागृती होणे ही काळाची गरज आहे. ॲड.पंकज बाफना….

[avatar]

सायबर क्राईमबद्दल जनजागृती होणे ही काळाची गरज आहे. ॲड.पंकज बाफना….

पुणे ( विशेष प्रतिनिधी) प्रांत पोलीस मित्र संघाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर भवन प्राधिकरण या ठिकाणी पोलीस कर्मचारी महिला व विद्यार्थी यांच्या सायबर क्राईम या विषयाच्या जनजागृतीसाठी सायबर क्राईम चे कायदेतज्ञ व सुप्रीम कोर्टाचे ॲड.पंकजजी बाफना यांनी प्रमुख वक्ते या नात्याने अत्यंत उपयुक्त असे व्याख्यान दिले.
 आपल्याकडून कळत-नकळत होत असलेल्या सायबर चुका आपल्याला किती शारीरिक मानसिक व आर्थिक दृष्ट्या धोकादायक ठरू शकतात त्यातून आपण बाहेर कसे निघायचे व आजच्या युगात इंटरनेट सेवा ही अत्यंत अत्यावश्यक झालेली आहे  परंतु त्यासोबतच आपल्याला अनेक समस्यांनाही तोंड द्यावे लागते त्यातून आपण सुरक्षितपणे कसे राहू याबद्दलचे अत्यंत मौलिक असे मार्गदर्शन ॲड. पंकज बाफना यांच्या व्याख्यानातून मिळाले.
 वरील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त मा.मंचकजी इप्पर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की सध्या सायबर क्राईम अत्यंत अधिक प्रमाणात वाढत असून त्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण आलेला आहे त्यामुळे जर सर्वसाधारण नागरिकांमध्ये जनजागृती झाली तर नक्कीच नागरिकांना सुरक्षित करणे कामी आम्ही पोलिसांकडून चांगली सेवा देऊ शकतो. प्रांत पोलीस मित्र संघ नेहमीच अशा समाजजागृतीच्या कार्यक्रमांना प्राधान्य देत महत्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करीत असते म्हणून त्यांचे विशेष कौतुक करतो.
 परंतु त्यासाठी नागरिकांनीही बऱ्याच गोष्टी या मोबाईल व कम्प्युटरच्या युगात सांभाळल्या पाहिजेत.
वरील कार्यक्रमासाठी प्रांत पोलीस मित्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल बिरारी कायदेशीर सल्लागार ॲड.पियाली घोष ॲड. अनिषा फणसाळकर महा.उपाध्यक्ष नितीन चिंचवडे महा.उपाध्यक्ष संदीप पोलकम देवयानी पाटील अशोक पवार प्रसिद्धी प्रमुख उदय निकम सुभाषजी मालुसरे मे.प्रताप भोसले ई.मान्यवर उपस्थित होते.
आजच्या युगातील सर्वांसाठी उपयुक्त अशा या जनजागृतीपर कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात स्मिता माने दत्ता अवसरकर शुभम पुरी सतीश मनसेगी सुशेन बिरारी संकेत डेरले यांचे विशेष योगदान होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी सरोते प्रस्तावना राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल बिरारी व आभार प्रदर्शन पुणे जिल्हा अध्यक्ष संदेश लाड यांनी केले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close