राज्यातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा कौतुक सोहळा भव्य दिव्य संपन्न.

[avatar]

राज्यातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा कौतुक सोहळा भव्य दिव्य संपन्न…..

राजीव गांधींनी केलेल्या संगणक क्रांतीमुळे शेतकऱ्यांची प्रगतीकडे वाटचाल-माणिकराव ठाकरे……
राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अडचणीत व समस्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहणार-प्रकाश साबळे……
पिंपरी पुणे (विशेष प्रतिनिधी)संगणक क्रांतीचे जनक माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी व माजी खासदार व पुरस्कार सोहळ्याचे जनक स्व. राजीव सातव यांना शेतकऱ्यांच्या वतीने अभिवादन.
दि २१ मे २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार वितरण सोहळा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार राज्यातील २६ प्रगतशील शेतकऱ्यांसह उत्कृष्ट तिफणकारी शेतमजुराचा तिफण प्रदान करून वैशिष्ट्यपूर्ण भावस्पर्शी सन्मान करण्यात आला. कृषीमित्र, कृषीमित्र,कृषी वैद्यांनीक, महिला शेतकरी, कृषी पत्रकार, शेतकरी उत्पादक कंपनी यांना मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा प्रकाश साबळे यांचे गेल्या १६ वर्षांपासून शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन.
           या प्रसंगी राजीव गांधी कृषिरत्न शेतकरी निवड समितीचे अध्यक्षा सौ. पोर्णिमाताई सवाई, अशोकरावजी मोरे, भैय्यासाहेब निचळ, प्रा. दिलीपराव काळे प्रा अमर तायडे, प्रा हेमंत डिके, विलास सवाने, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले .

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close