बाहे येथे रंगला कबड्डीचा थरार,होम ग्राउंडवरच मारली अंतिम विजयाची बाजी…

[avatar]

बाहे येथे रंगला कबड्डीचा थरार,होम ग्राउंडवरच मारली अंतिम विजयाची बाजी…                                                                                 कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील मौजे बाहे येथे कोलाड विभाग असोसिएशन यांच्या मान्यतेने कोलाड विभागीय कबड्डी सामन्यांचे आयोजन 22 फेब्रुवारी रोजी बाहे येथील राजीप शाळेच्या प्रांगणात केले होते गेली चार ते पाच वर्षे कोलाड असो च्या माध्यमातून कबड्डी स्पर्धा गावोगावी होत असून चालू वर्षात प्रथमच गावदेवी बाहे या संघाला या असोसिएने सहभागी केले त्याच सहभागातून प्रथमतः बाहे येथे कोलाड विभागीय कबड्डीचा थरार या ठिकाणी रंगला आणि घरच्याच ग्राउंवर विरोधी संघाना पराभूत करत अंतिम विजयाची बाजी मारत कोलाड असोसिएनच्या संघानमध्ये हुकमाचा एक्का ठरला आहे,
गावदेवी क्रीडा मंडळ बाहेच्या वतीने कोलाड असो व कोलाड विभागीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती यावेळी विभागातील बहुसंख्ये संघांनी आपला सहभाग नोंदवलेले अष्टपैलू खेळाडूंची खेळी व कबड्डीचा थरार रशिकप्रेशक व क्रीडा प्रेमींना या प्रांगणात आनंददायी व उत्साह देणारा ठरत होता उपांत्य फेरीत बाहे विरिद्ध वरसगाव असा सामना रंगला या रंगतदार अटीतटीच्या लढतीत अखेर बाहेच्या विजय माठल यांनी उत्कृष्ट कामगिरी करत अतिंम फेरी गाठली तर दुसरीकडे पाले खुर्द व दूरटोळी यांच्यात मोठी चुरस झाली यात पाले खुर्द संघाचा शुभम यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत दूरटोळीच्या खेळाडूंना बात करत अंतिम फेरीत संघाला प्रवेश मिळवून देत अखेर शेवटी अंतिम फेरीतील सामना बाहे विरोधात पाले खुर्द अशी रंगतदार लढत अटीतटीचा हा सामना व खेळाडूंची रंगदार खेळी व थरार या मैदानावर प्रेक्षकांना पहावयास मिळत होते अखेर या अटीतटीच्या लढतीत देखील आपल्या घरच्या मैदानावर गावदेवी बाहे संघांनी पाले खुर्द संघाचा पराभव करत अंतिम फेरीत विजयाचा जल्लोष करत विजेतेपद पटकावले तर पाले खुर्द संघाला अखेर उप विजेत्या पदावर समाधान मानावे लागले तर तृतीत क्रमांक वरसगाव व चतुर्थ क्रमांक दूरटोळी संघाने पटकावले सामन्यात मालिकावीर म्हणून विजय माठळ(बाहे)उत्कृष्ट चढाई- गणेश (वरसगाव) उत्कृष्ट पक्कड शुभम(पालेखुर्द) यांना सन्मानीत करण्यात आले,
प्रसंगी या कार्यक्रमाला देवकान्हे ग्राम पंचायतीचे सरपंच वसंत भोईर,सदस्य रवींद्र भोईर,एन व्ही मरवडे रायगड भूषण डॉ श्याम लोखंडे गोपाळ थिटे चंद्रकांत थिटे मणिज थिटे जगदीश थिटे राकेश बामुगडे तसेच असो अध्यक्ष महेश ठाकूर तसेच उपाध्यक्ष सेक्रेटरी सह पदाधिकारी आदी गावदेवी बाहे व ग्रामस्थ तसेच रशिकप्रेशक बहुसंख्येने उपस्थित होते,
सामने यशस्वीतेसाठी गावदेवी क्रीडामंडल बाहे च्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले,

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close