भावना गवळींनी मोदींना राखी बांधली अन् ईडीची कारवाई टळली…… 

[avatar]

भावना गवळींनी मोदींना राखी बांधली अन् ईडीची कारवाई टळली……
नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी)एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली.त्यानंतर शिवसेनेच्या 12 खासदारांनी देखील एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा भाजपवर आरोप करण्यात आला.
खासदार भावना गवळी यांच्यावर महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे. याअंतर्गत ईडीने सप्टेंबर महिन्यात भावना गवळी यांच्याशी संबंधित ईडीने सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने या प्रकरणात सईद खान या व्यक्तीला अटक केली आहे. ईडीतील सुत्रांनी सांगितले. गवळी यांच्या ट्रस्टमध्ये सईद खान हे संचालक होते. या ट्रस्टला बेकायदेशीररित्या कंपनीमध्ये रूपांतरीत करण्यासाठी सईद खान यांनी मध्यस्थी केली. त्यासाठीच धर्मदाय आयुक्त कार्यालायात देखील गैरव्यवहार झाला. एकुण घोटाळा 18 कोटी रूपयांचा आहे. शिवाय सात कोटी रूपयांच्या रोख रकमेचा देखील गैरव्यवहार करण्यात आला. अशी माहिती इडीला मिळाली आहे. ईडीकडून चौकशी झाल्याने शिंदे गटात सामील झाल्यात.
शिवसेेनेच्या खासदार भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात एक पत्र देखील लिहिलं होतं. मात्र त्यावर उद्धव ठाकरे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर खासदारांचा एक गट एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाला. त्यात भावना गवळींचा देखील समावेश आहे. अशातच आज रक्षाबंधनाच्या दिवशी भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली आणि इडीची कारवाई टाळली असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजप करीत असल्याचं विरोधी पक्ष सातत्याने सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 बंडखोर आमदारांवर देखील छोटे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. अशातच आता जे इतर पक्षातून भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्यावर देखील इडीचा दवाब असल्याचा आरोप राजकीय नेते करीत आहेत. त्यातच काल एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना स्थान देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात पुण्यात निदर्शने केली होती.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close