महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची महाराष्ट्र राज्याची सभा चंद्रपूर येथे संपन्न…… 

[avatar]

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची महाराष्ट्र राज्याची सभा चंद्रपूर येथे संपन्न……

दिनांक 15/10/2022 रोजी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची महाराष्ट्र राज्याची सभा चंद्रपूर या ठिकाणी घेण्यात आली सदर सभे साठी महाराष्ट्र राज्यच कार्याधक्षय मा. श्री. कुरणे साहेब ह्यांनी सभा अध्यक्ष म्हणून काम काज पहिले हया सभे साठी 13/10/2022 पासून संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे सहभागी झाले होते त्यांचे नियोजन नागपूर विभागाचे विभाग अध्यक्ष मा. श्री. राजूजी धाडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. शैलेश धात्रक यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केले सादर सभे साठी कोकण विभागाचे अध्यक्ष मा. श्री. प्रशांतजी कापडे साहेब उपस्थित होते तसेच रायगड जिल्ह्याच्या वतीने रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस मा. श्री. भूषण विश्वासराव पाटील हे उपस्थित होते. सदर सभे मध्ये दांगट समितीचा अहवाल प्रसिद्ध करणे, महसूल विभागाचा नवीन आकृतीबंद तयार करणे, महसूल सहाय्यक यांचे ग्रेड वेतन सहाव्या वेतन आयोगा नुसार 2800 करणे, पुरवठा विषयक कर्मचारी यांचे कडून विकल्प घेणे, महसूल सहाय्यक पद भरती बाबत शासनास निवेदन देणे तसेच या पुढील संघटनेच्या नवीन निवेदना बाबत चर्चा करण्यात आली. सदर सभे मध्ये रायगड जिल्हा सरचिटणीस भूषण विश्वासराव पाटील यांनी निवडणूक विषया बाबत महाराष्ट्रातील सर्वच तालुक्यात मध्ये निवडणूक अव्वल कारकून हे पद नव्यात तयार करणे बाबत शासनास निवेदन देणे बाबत राज्य कार्यकारणीस विनंती केली व आपला मुदा कश्या प्रकारे योग्य आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी यांना समजावून सांगितला हया सभे साठी उपस्थित सर्व जिल्हा अध्यक्ष ह्यांना चंद्रपूर जिल्ह्याची कॉपी to बुक देण्यात आली. तसेच संघटनेची पुढील रणनीती काय असणार आहे. हया वर साधक बांधक चर्चा झाली.

*आता भविष्यात महसूल कर्मचारी संघटना आपल्या न्यायिक मागण्या साठी कश्या प्रकारे आंदोलन करून शासनास निवेदन देणार याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे.*

*सदैव आपला*
*भूषण विश्वासराव पाटील*
*रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना*
*जिल्हा सरचिटणीस*

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close