डॉ.सी.डी. देशमुख महाविद्यालयने केले बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन….. 

[avatar]

डॉ.सी.डी. देशमुख महाविद्यालयने केले बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन…..

वजहा फाउंडेशन व कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ.कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय,रोहा रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथील ब्रिस्टॉल हॉटेलमध्ये “Rising of Global India : Aspirations, Possibilites and Challenges ”
या विषयावर आधारीत बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन
राज ग्रुप ऑफ कंपनी दुबईचे व्यवस्थापकीय संचालक मुस्तफा सासा यांच्या शुभहस्ते झाले.या परिषदेचे बीजभाषन नागपूर विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ.संजय दुधे यांनी केले.
या परिषदेचा मुख्य उद्देश भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर उदयोन्मुख असणाऱ्या प्रेरणा,शक्यता आणि आव्हाणे यावर चर्चा घडवून आणणे आणि इतर देशातील प्रगतीचा आढावा घेवुन चर्चा करणे हा होता.
या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकुण ७५ विविध शाखेतील संशोधक उपस्थित होते.त्यापैकी ३८ संशोधकांनी वेगवेगळ्या विषयावर आपले शोधनिबंध सादर केले.
एकूण ३८ शोधनिबंधानपैकी
५ संशोधन निबंध सर्वोत्कृष्ट म्हणुन निवडण्यात आले व या पाच शोधनिबंधाच्या संशोधकांना प्रख्यात संशोधक म्हणून स्नमानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
यामध्ये नागपूर येथील आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स डिपार्टमेंटचे डॉ.विनोद जी. गजघाटे,
तुमसर येथील एस. जे.बी महिला महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख डॉ.मुबारक कुरेशी,अलिबाग येथील जे.एस.एम.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, रोहे येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या डॉ.चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ.कुसुमताई कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल साळुंके व नागपुर येथील सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटचे डॉ.गुणवंत गाडेकर यांचा समावेश आहे.

तसेच या परिषदे उत्कृष्ट संशोधक म्हणुन आसाम विद्यापीठाच्या प्रोफेसर डॉ. मोलनकल गंगाभूषण यांची निवड झाली.
परिषदेचा समारोप दुबई येथील प्राचार्य डॉ.के.जे.चॅरियन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन गोंडवाना विद्यापीठाचे प्रकुलगुरु
डॉ.श्रीराम कावळे उपस्थित होते.
समारोप प्रसंगी सर्व संशोधकांना मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close