वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा चतुर्थ दिवस ! कठुआ बलात्कार प्रकरण : हिंदूंना जम्मूतून हाकलून देण्यासाठीचे षड्यंत्र !- प्रा. मधु किश्वर, लेखिका…… 

[avatar]

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा चतुर्थ दिवस ! कठुआ बलात्कार प्रकरण : हिंदूंना जम्मूतून हाकलून देण्यासाठीचे षड्यंत्र !- प्रा. मधु किश्वर, लेखिका……

फोंडा(विशेष प्रतिनिधी)वर्ष 2018 मध्ये जम्मूतील रसाना नावाच्या लहानशा गावातील खोट्या बलात्कार प्रकरणाला ‘कठुआ बलात्कार’ प्रकरण म्हणून जगभर प्रसिद्ध करण्यात आले आणि षड्यंत्रपूर्वक हिंदूंना त्यात गुंतवून बदनाम करण्यात आले. देशभरातील सेक्युलरवाद्यांनी, बॉलीवूडच्या अभिनेत्यांनी आणि हिंदु-विरोधकांनी या प्रकरणाचा वापर जगभरात हिंदूंना बदनाम करण्यासाठी केला. हिंदूंनी पीडितेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली, असे कथानक खोट्या पुराव्यांच्या आधारे तयार करून त्याचा जगभर प्रचार केला. यामागे हिंदूंना बदनाम करण्याचे आणि काश्मीरनंतर जम्मूच्या क्षेत्रातून बाहेर काढण्याचे एक नियोजनबद्ध षड्यंत्र होते, असा आरोप दिल्ली येथील ‘द गर्ल फ्रॉम कठुआ’ या पुस्तकाच्या लेखिका आणि ‘मानुषी’च्या संपादिका प्रा. मधु किश्वर यांनी केला. त्या ‘श्रीरामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘कठुआ येथील सत्य’ या विषयावर बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, या प्रकरणात हिंदूंवर ‘गँगरेप’चा आरोप लावण्यात आला; मात्र शवविच्छेदन अहवालात बलात्कार झाल्याचा निष्कर्षच मान्य केलेला नाही. संबंधित मुलीच्या डोक्यात दगड घालून हत्या तिची करण्यात आली, असे पोलीस तपासात नमूद असतांना शवविच्छेदन अहवालात कुठेही कवटीला मार लागलेला दिसून आला नाही. अशा अनेक विसंगती त्या अहवालात आढळून आल्या आहेत. कोणत्याही अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात पीडितेची ओळख उघड करणे कायद्याने गुन्हा आहे; पण या प्रकरणामध्ये पीडितेचे छायाचित्र आणि नाव माध्यमांमधून जाणीवपूर्वक उघड करण्यात आले. या प्रकरणात तपासाच्या नावाखाली हिंदू युवकांचा छळ करण्यात आला. परिणामी कठुआतून अनेक हिंदू कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले.

पुढील 5 वर्षांत अरुणाचल प्रदेशमधील ख्रिस्ती धर्मांतराची समस्या संपवू ! – श्री. कुरु ताई, अरुणाचल प्रदेश

सध्या अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येक कुटुंबातील एक तरी सदस्य धर्मांतरित आहे, इतकी गंभीर स्थिती आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही एक उपाय काढला. जी हिंदु व्यक्ती अन्य धर्मांतील व्यक्तीशी विवाह करेल, तिला हिंदू कुटुंबातील संपत्ती मिळणार नाही आणि तिची मुलेही तिला स्वतःलाच सांभाळावी लागतील. यामुळे या समस्येला काही प्रमाणात चाप बसला आहे. अरुणाचल प्रदेशमधील आम्ही हिंदू संघटित असल्याने पुढील 5 वर्षांत अरुणाचल प्रदेशमधील ख्रिस्ती धर्मांतराची समस्या संपवू, असा ठाम विश्वास ‘अरुणाचल प्रदेश बांबू संसाधन आणि विकास एजेंसीच्या उपाध्यक्ष कुरु ताई यांनी व्यक्त केला.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close