बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई;पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल……. 

[avatar]

बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई;पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…….
पनवेल(विशेष प्रतिनिधी) : जंगलात गावठी हातभट्टीची दारू गाळण्याकरता बेकायदेशीर भट्टी लावून गावठी हातभट्टी दारू तयार केल्याप्रकरणी बारापाडा येथील दोघांविरोधात यांच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्हेगाव लहुजी वाडी येथील जंगलात एका इसमाने गावठी दारू गाळण्याकरता हातभट्टी लावली असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, सुनिल कुदळे, मनोहर इंगळे आदींचे पथक त्या ठिकाणी गेले असता जंगलात दोन जण लोखंडी पातेले चुलीवर ठेवून लाकडाने पातेल्यात काहीतरी ढवळत असल्याचे दिसले. त्यांना पोलीस पथक येण्याची चाहूल लागली असता ते जंगल परिसरात पळून गेले. त्या ठिकाणी १६ हजार रुपये किमतीचे रसायन, आठ हजार रुपये किमतीची ४०० लिटर गावठी दारू, लोखंडी पातेले, प्लास्टिकचे ड्रम पोलिसांनी जप्त केले आहेत.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close