श्रीवर्धनच्या भामट्याला कोलाड पोलिसांनी नशाकारक अवैध अमली चरस विक्री करताना रंगेहाथ पकडले,गुन्हा दाखल……

[avatar]

श्रीवर्धनच्या भामट्याला कोलाड पोलिसांनी नशाकारक अवैध अमली चरस विक्री करताना रंगेहाथ पकडले,गुन्हा दाखल……

कोलाड ( श्याम लोखंडे ) कोलाड येथे अवैध धंदे करणाऱ्यांवर कोलाड पोलिसांचा चांगलाच चाप बसला असून कोलाड रोहा राज्य मार्गावर हॉटेल मराठा पॅलेस समोर एका अवैध नशाकारक अमली चरस विक्री करणाऱ्या भामट्याला रंगेहाथ पकडले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

गेली अनेक दिवस हा श्रीवर्धन येथे राहणारा भामट्या कोलाड येथे येऊन अवैध नशाकारक अमली चरस विक्री करत असल्याची कुणकुण तशी गुपचूप चर्चा कोलाड नाक्यावर घुमसत होती मात्र त्यावर पारथ ठेऊन अखेर त्यास पकडण्यात कोलाड पोलिसाना अखेर रविवारी 10 सप्टेंबर रोजी रात्री यश आले.तर सदरचा भामटा अन्य चरस हा मादक व नशाकरक आमली पदार्थाची भवैदयपणे विक्री करत असल्याने त्यास कोलाड पोलिस उपनिरीक्षक अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बरोबर साफला रचून देवेंद्र जयदास पाटील, वय 26, रा. वरचा जिवना राममंदीराजवळ ता श्रीवर्धन जि रायगड यास कोलाड रोहा मार्ग हॉटेल मराठा पॅलेस समोर विक्री करत असताना कोलाड पोलिसांनी पकडले आहे.

कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार
वरील तारखेस वेळी व ठिकाणी यांतील आरोपी देवेंद्र जयदास पाटील हा दिनांक 10/09/2023 रोजी 23.25 वा दरम्यान कोलाड पोलीस ठाणे हददीतील मौजे कोलाड वरून रोहा बाजुकडे जाणारे रस्त्यावर मराठा पॅलेस हॉटेलजवळ आलेवेळी आपले ताब्याकब्जात 1068 ग्रॅम वजनाचा अवैदय चरस, हा मादक व नशाकरक आमली पदार्थाची अवैद्यपणे विक्री करण्याकरीता स्वताचे ताब्याकब्जात बाळगले स्थितीत मिळुन आला म्हणुन हददीतील मौजे कोलाड वरून रोहा बाजुकडे जाणारे रस्त्यावर मराठा पॅलेस हॉटेलजवळ आलेवेळी आपले ताब्याकब्जात 1068 ग्रॅम वजनाचा 534000 किंमतीचा लाल रंगाची नक्षीदार पिशवी त्यावर इंग्रजी लिमेटेड अॅडीशन .व स्टारबक्स, हॉलीडे ब्लेन्ड लहलेले सदर पिशवीवर पाठीमागे बाजूस स्टारबक्स हॉलीडे ब्नेन्ड, लिहलेले सदर पिशवी उघडुन बघीतले असता आतमध्ये आनखी एक लाल रंगाची पिशवी असुन पिशवीसह वजन 1102 ग्रॅम आहे तसेच वरील प्लास्टीक पिशवी काढुन आतमध्ये काळपट रंगाचा चिकट असा उग्र वासाचा चरस हा अमली पदार्थ एकुण 1068 ग्रॅम वजनाचा प्रति ग्रॅम रु 500 प्रमाणे कि अं. एकुण 534000 माळ जप्त करण्यात आले आहे.

सदरच्या गुन्ह्याची नोंद कोलाड पोस्टे गुरनं 0091/2023 एन. डी. पी. एस. अधिनियम, 1985,एन.डी.पी.एस. अधिनियम, 1985 8(C), 20 (B) II (C) प्रमाणे करण्यात आली असून कोलाड पोलिस उपनिरीक्षक अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी अधिक तपास करत आहेत .

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close