पैशाचा पाऊस, काळी विद्या, … मांत्रिक सापडला रोहा शाळेतील जादूटोणा… बुलढाण्यात धरपकड;शिक्षक, व्यापारी, बिल्डर… असे एकूण ९ आरोपी….अखेर रोहा पोलिसांनी प्रकरण धसास लावले….. 

[avatar]

पैशाचा पाऊस, काळी विद्या, … मांत्रिक सापडला रोहा शाळेतील जादूटोणा… बुलढाण्यात धरपकड;शिक्षक, व्यापारी, बिल्डर… असे एकूण ९ आरोपी….अखेर रोहा पोलिसांनी प्रकरण धसास लावले…..

रोहा(समीर बामुगडे) रोहा तालुक्यातील धामणसई येथील स्मशानभूमीत आणि खाजगी शाळेत अघोरी काळी विद्या, जादूटोणा करण्याचा प्रकार शनिवार १२ ऑगस्ट रोजी झाला होता… हा सर्व उपद्व्याप  पैशाचा पाऊस पाडण्यासाठी होता… शिक्षक, व्यापारी, बिल्डर, मांत्रिक अशा लोकांचा यामध्ये सहभाग होता… या जादूटोण्यामुळे रोह्यात नरबळीची भीती होती… ही भीती लोकांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली होती… रोह्यातील जागरूक नागरिक आणि रोहा पोलिस… यांच्यामुळे हे प्रकरण उघड झाले होते… जवळजवळ महिन्याभराने रोह्यातील हे जादूटोणा, पैशाचा पाऊस पाडण्याचे प्रकरण पुन्हा एकदा रडारवर आले आहे… यातील मुख्य आरोपी असलेल्या मांत्रिकाची धरपकड करण्यात पोलिसांना यश आलेय… रोहा पोलिसांनी बुलढाण्यातून मांत्रिक अमोल सोळंके याची गठडी वळली… गुन्हा घडल्यापासून हा मांत्रिक दीड महिना फरारी होता… पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हिवरकर व त्यांच्या टिमने २६ सप्टेंबर रोजी  मांत्रिक अमोल सोळंके याला निवाना गावातून ता.संग्रामपुर जिल्हा बुलढाणा येथुन अटक केली… या प्रकरणात आता पर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे…   या जादूटोण्यासाठी रत्नागिरीतून खास संतोष मारुती पालांडे वय ५० वर्षे रा. खेड जि रत्नागिरी, प्रदिप पांडुरंग पवार वय ६० वर्षे रा. कुवारबाव जि. रत्नागिरी, प्रविण अनाजी खांबल वय ४७ वर्षे रा. नाचणे जि. रत्नागिरी, सचिन अशोक सावंतदेसाई वय ४९ वर्षे रा. खेडशी जि. रत्नागिरी, दिपक दत्ताराम कदम वय ४१ वर्षे रा. कुवारबाव जि रत्नागिरी, मिलींद रमेश साळवी वय ५१ वर्षे रा. चिपळूण जि. रत्नागिरी… या तालेवार लोकांची त्यावेळी उपस्थिती होती… धामणसई गावच्या स्मशानभूमीत आणि एका खाजगी शाळेत काळ्या रंगाच्या बाहुल्या, लिंबू, सुई, हळद-कुंकू, फुले अशी पूजा आढळून आली होती… दुपारी ग्रामस्थांना हा प्रकार समजला… अघोरी पुजा करणाऱ्या इसमांकडे ग्रामस्थांनी चौकशी केली असता त्यांने  दिशाभूल करणारी उत्तरे दिली. उत्तरांनी समाधान न झाल्याने ग्रामस्थांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मात्र पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी मुख्य मांत्रिक अमोल सोळंके हा फरारी झाला… त्याची मंगळवारी बुलढाण्यातून धरपकड करण्यात आली… दरम्यान सध्याच्या कॉम्पुटर, मोबाईल आणि ५ जीच्या युगात देवदेवस्की, करणी, जादूटोणा, काळी विद्या यावर विश्वास असणाऱ्यांची खिल्ली उडवली जात आहे… ही सर्व अंधश्रद्धा असल्याचे बोलले जात आहे… गुप्तधनाच्या  लालसेतून हा अंधश्रद्धेचा   प्रकार घडल्याची चर्चा आहे…  मात्र अशा अंधश्रद्धेला लोकांनी बळी पडू नये असे  आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close