तीन चाकी पॅजो ऍपे टेम्पोची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस गुन्हेशाखा कक्ष २ पनवेलने केले गजाआड; १४ गुन्हे आणले उघडकीस…… 

[avatar]

तीन चाकी पॅजो ऍपे टेम्पोची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस गुन्हेशाखा कक्ष २ पनवेलने केले गजाआड; १४ गुन्हे आणले उघडकीस……
पनवेल(संजय कदम): नवी मुंबई, ठाणे तसेच इतर जिल्हयातून तीन चाकी पॅजो ऍपे टेम्पो चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस गुन्हेशाखा कक्ष २ पनवेल कडुन अटक करून १४ गुन्हे उघडकीस आण्यात यश आले आहे. तसेच या आरोपींकडून नवी मुंबई, ठाणे व इतर जिल्हयातील १० ऍपे टेम्पो, एक मोटर सायकल व एक टेम्पोचे इंजिन हस्तगत करून एकुण ८ लाख ४४ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हदिदमध्ये अपे टेम्पो चोरीचे गुन्हयांत झालेली वाढ लक्षात घेता पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह. पोलीस आयुक्त संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमित काळे यांनी ऍपे टेम्पो चोरीतील गुन्हयांना आळा घालणेकामी व घडलेले गुन्हे उघडकीस आणन्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) गजानन राठोड यांच्या सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष २, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी ‘यांनी विशेष पथक स्थापन केले. सदर पोलीस पथकाने नवी मुंबई व ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या गुन्हयांची माहिती प्राप्त केली. त्याअनुषंगाने सर्व दाखल गुन्हयांतील चोरीस गेलेल्या ऍपे टेम्पो चोरीचे घटनास्थळांना भेट देवून तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार यांचे मदतीने तपास सुरू केला. गोपनिय बातमीदारांकडुन अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपीबाबत अधिक माहिती घेवून गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलच्या पोलीस पथकाने कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयाममधील आरोपी अन्वर रसुलखान पठाण (वय ३९) यास अटक केली. आरोपीने चोरी केलेले इतर ऍपे टेम्पो गुन्हयातील पाहिजे आरोपींना विकल्याची माहिती दिल्यानंतर आरोपी मन्नन अब्दुल शेख (वय ३६) यास परतुर, जिल्हा जालना येथुन व आरोपी फिरोज मुक्करम शेख उर्फ मुल्ला (वय ४९) यास बीड येथून ताब्यात घेवून त्यांचेकडुन चोरीचे विकत घेतलेले ऍपे टेम्पो हस्तगत करण्यात आले आहेत. या तीनही आरोपींना अटक करून आरोपीकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात १० ऍपे टेम्पो, एक मोटर सायकल, एक टेम्पोचे इंजिन व चोरीचे टेम्पो स्क्रॅप करून विक्री केलेली रक्कम असा ८ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून, कळंबोली, एनआरआय, खारघर, नेरुळ, ठाणे, अहमदनगर, परभणी, बीड, औरंगाबाद, जालना या ठिकाणचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. हस्तगत केलेल्या टेम्पो पैकी एक ऍपे टेम्पो व एक इंजिन बाबत अधिक तपास सुरू आहे. या गुन्हेगारांना अटक करण्यासाठी गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली सपोनि प्रविण फडतरे, पोउपनि मानसिंग पाटील, दिलीप भंडे, सुनिल गिरी, पो.हवा. मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, रमेश शिंदे, अनिल पाटील, सचिन पवार, अजित पाटील, निलेश पाटील, सागर रसाळ, दिपक डोंगरे, इंद्रजित कानू, रूपेश पाटील, राहुल पवार, जगदिश तांडेल, पो.ना. आजिनाथ फुंदे, पो.शि. संजय पाटील, विक्रांत माळी नंदकुमार ढगे, अमोल कर्डीले, अमोल मोहिते, मपोशि अदिती काकडे आदींनी मेहनत घेतली आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close