एक दिवस कायस्थांचा व एकवीरा आई पालखी सोहळा…… 

[avatar]

एक दिवस कायस्थांचा व एकवीरा आई पालखी सोहळा……

पुणे (विशेष प्रतिनिधी) चांद्रसेनिय कायस्थ प्रभू संस्था आणि चांद्रसेनिय कायस्थ प्रभू उत्कर्ष संस्था यांच्या बरोबर सहआयोजक म्हणून सहभागी झालेल्या पुण्यातील पुणे सीकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्ट व चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा,एक दिवस कायस्थांचा व एकवीरा देवीचा पालखी सोहळा शनिवार दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी ठरलेल्या रुपरेषेप्रमाणे कार्ला गडावर व गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘ स्वप्नपूर्ती बंगला ‘ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर सोहळ्यास असंख्य ज्ञाती बांधवांनी हजेरी लावली.
यावर्षी आम्ही केलेल्या आवाहनानुसार ६० ते ७० ज्ञाती बांधवांनी आदल्या दिवशी पासूनच हजेरी लावली. त्याच बरोबर साधारण २०० ते २५० बांधवांनी दुसऱ्या दिवशी ही स्वप्नपूर्ती बंगला येथे या सोहळ्याचा आनंद घेतला. ज्यामुळे पहाटेच्या अभिषेका पासून सुरू झालेला हा सोहळा पुढे होम, हवन, पालखी, गोंधळ, आरती व त्यानंतर महाप्रसाद या रूपरेषे नुसार निर्विघ्नपणे पार पडला. ज्ञाती बांधव एकत्र येऊन संपर्क, सहवास आणि समन्वय असा त्रिवेणी संगम झालेला पहावयास मिळाला. ज्यामुळे एक दिवस आणि रात्र एकत्र येऊन जणू कायस्थांच्या संमेलनाचे स्वरूप या कार्यक्रमास प्राप्त झाले व ज्या उद्देशाने ही रूपरेषा आखली तो सफल झाल्याचे समाधान मिळाले.

सदर कार्यक्रमा करिता नेमलेल्या समित्या व त्यातील सदस्यांनी नेमून दिलेली कामे अतिशय चोखपणे आणि तेवढ्याच उत्साहाने पार पाडली. संयोजन समितीत प्रामुख्याने, स्वप्नील प्रधान, जयदीप कोर्डे, माणिक गडकरी, गजेंद्र गडकरी, मिलिंद मथुरे, वृंदा मथुरे, सागरिका व संजोग कर्णिक, पुष्कर गुप्ते, संजना गुप्ते, भूषण देशपांडे, मंदार कुळकर्णी, नीलेश गुप्ते, चिन्मय चौबळ, सुविज्ञ गुप्ते, प्रतिक मथुरे, पायल मथुरे, विवेक पाटणकर, संकेत कर्णिक, प्रकाश गुप्ते, नताशा कारखानीस, गौरी मथुरे, ईशा दिघे, अशोक कुळकर्णी, प्रसाद मथुरे, भूषण देशपांडे, नागेश देशमुख यांनी महत्वाची भूमिका बजावली.
अशी माहिती सिकेपी उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष श्री. विकास देशमुख दिली.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close