रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे भगवे वादळ… पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रोह्यात १ फेब्रुवारीला झंझावाती सभा… एकच नारा … लढणार आणि जिंकणार……. 

[avatar]

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे भगवे वादळ… पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रोह्यात १ फेब्रुवारीला झंझावाती सभा… एकच नारा … लढणार आणि जिंकणार…….

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा झंझावात अख्ख्या रायगड जिल्ह्यात धडकणार आहे. रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १ आणि २ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात सहा झंझावाती सभा घेणार आहेत.
येत्या गुरुवारी १ फेब्रुवारी रोजी रोह्यात होणाऱ्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. रोह्यात होणाऱ्या सभेमुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला आहे. रोह्यात शिवसैनिकांशी संवाद साधतानाच ते गद्दारांचा आणि भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा कशाप्रकारे समाचार घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
१ फेब्रुवारी आणि २ फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर असतील. यात पोलादपूर, म्हसळा, माणगाव, अलिबाग, रोहा आणि पेण येथे विभागवार सभा होतील. हे नियोजन करण्याचं काम सध्या वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिकांची भेट घेणार आहेत.
फुटीर आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांचा अन्यायकारक निवाडा, हिंदूत्व आणि त्या अनुषंगाने भाजपाने केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झंझावाती सभा घेत आहेत. रायगड लोकसभा निवडणूक प्रचाराला या सभेने सुरूवात होणार आहे. या सभेला सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख समीर शेडगे व शहरप्रमुख दीपक तेंडुलकर यांनी केले आहे.

सभा यशस्वी करण्यासाठी उपतालुका प्रमुख महादेव साळवी, संजय भोसले, विभाग प्रमुख नितीन वारंगे, शाखा प्रमुख निलेश वारंगे, कुलदीप सुतार, ॲड हर्षद साळवी, महिला तालुका संघटक नीता हजारे, शहर संघटक समिक्षा बामणे, युवा तालुका अधिकारी राजेश काफरे, विभाग प्रमुख संतोष खेरटकर, सचिन फुलारे, अनिष शिंदे, मजहर सिद्दीकी, बिलाल मोर्बेकर, मुझम्मिल येरूणकर, समीर डाखवे, भारत वाकचौरे, मनोज लांजेकर, अनिष शिंदे, आनंद भुवड, आदित्य कोंढाळकर, प्रेरित वलीवकर, इरफान दर्जी, दुर्गेश नाडकर्णी, राम महाडिक, विष्णू लोखंडे, ओमकार गुरव, अमित कासट, मनोज तांडेल, नंदकुमार बामुगडे, मंगेश पवार, शंकर मिलगिरे, हरेश जाधव आदी परिश्रम घेत आहेत.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close