कर्जतमध्ये एकविरा आई पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत….. 

[avatar]

कर्जतमध्ये एकविरा आई पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत…..

कर्जत(विशेष प्रतिनिधी) श्री एकविरा आई पदयात्रा पालखी सोहळ्याचे वडोळगांव ता.अंबरनाथ ते श्री क्षेत्र एकवीरा (कार्ला) पालखी पदयात्रा यावर्षी नवव्या वर्षात पदार्पण झाले असून गुरुवार दि. 25 जानेवारी पासून गांवदेवी मंदिर वडोळगांव,अंबरनाथ ते श्री क्षेत्र एकविरा आई पदयात्रा पालखी सोहळ्याचे ३ दिवसीय गावदेवी मित्र मंडळ वडोळगांव यांच्या वतीने मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.
सदर पालखीचे गावदेवी मंदिर वडोळगाव (अंबरनाथ) येथून सकाळी ७ वाजता पायी पालखीचे कार्ल्याकडे आगमण झाल्यानंतर मानकिवली गांवदेवी मंदिर कानसाई, शेलू गणपती मंदिर, साईबाबा मंदिर मोहाचीवाडी नेरळ, ते दि, 26 जानेवारी 2024 रोजी आंबेमाता मंदिर भिसेगांव कर्जत येथे दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था पत्रकार नरेश जाधव आणि परिवार तसेच यमुताई बालाजी विचारे मा.नगरसेविका कर्जत नगरपालिका यांच्या तर्फे करण्यात आले होते.
त्यानंतर भिसेगांव आंबेमाता मंदिर येथून भिसेगांव गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आल्या नंतर भिसेगांव ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे स्वागत व महिलांनी आरती करून मनोभावे एकविरा आईचे दर्शन घेतले त्यानंतर पायी पालखी पदयात्रा सोहळ्यासाठी पुढील मार्गस्थ रवाना झाली.
त्याप्रसंगी भगवान जाधव,उद्योजक, बालाजी विचारे,वैभव डागा, सुधीर हगवणे,चेतन मते,कुमार म्हसे,मिलिंद दिसले,संजय हजारे (पोलीस पाटील), पुंडलिक भोईर,नागेश भरकले, अनंता क्षीरसागर,विनायक,सुलेमान मिरगोळी,तुषार बॅनर्जी,सागर गुप्ता,शरद हजारे, पत्रकार नरेश जाधव,पूनम जाधव, साक्षी जाधव,अक्षदा जाधव,ओम जाधव,साई जाधव,आदी ग्रामस्थ महिलांसह दहिवली, कर्जत, भिसेगांव ग्रामस्थ पालखी सोहळ्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close