समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध- कु.आदिती तटकरे… प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय परेड मैदानात महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न……. 

[avatar]

समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध- कु.आदिती तटकरे… प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय परेड मैदानात महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न…….

शहानवाज मुकादम/रोहा
रायगड:दि.26/जाने/2024 (जिमाका) समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, दुर्बल घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे पर्व निरंतर सुरु रहावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.
पोलीस मुख्यालयाच्या मैदानात भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी आयोजित दिमाखदार सोहळ्यात जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित करताना त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड , जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विठ्ठल इनामदार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या, आदी मान्यवर व इतर अधिकारी, कर्मचारी, नागरिक, पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close