माघी गणेशोत्सवानिमित्त श्री स्वयभु गणपती तीर्थक्षेत्र घोसाळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन……. 

[avatar]

माघी गणेशोत्सवानिमित्त श्री स्वयभु गणपती तीर्थक्षेत्र घोसाळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन…….

रोहा (विशेष प्रतिनिधी) रोहा तालुक्यातील घोसाळे येथे श्री. गणपती ट्रस्ट मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी मिती माघ शु. चतुर्थी शके १९४५, मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी माघीगणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून या प्रसंगी धार्मिक तथा आध्यत्मिक तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

तरी या कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरीवार गणेश दर्शनास येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणपती ट्रस्ट मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री गणपती ट्रस्ट घोसाळे ता. रोहा, जि. रायगड (नोदणी क्र.: ई.३१२६७) यांच्या वतीने या कार्यक्रमानिमत्ताने माघी गणेशोत्सवानिमित्त “आम्ही चालऊ पुढे वारसा ” या अनुषंगाने सोमवार १२ फेब्रु.२०२४ रोजी निबंध आणि चित्रकला स्पर्धा, सकाळी १० वाजता,वक्तृत्व स्पर्धा,नृत्याविष्कार , सायं.०८:०० ते रात्रौ. १०:०० वा. तर मंगळवार १३ फेब्रु. २०२४ रोजी सकाळी ७ वाजता.श्री. गणेश अभिषेक , सकाळी १० ते ११:३० वा.ग्रामस्थ मंडळी घोसाळे यांचे भजन,११ वा .हळदीकुंकू समारंभ
दुपारी १२ वा.श्री. गणेश जन्म तद्नंतर श्रींची महाआरती,दुपारी महाप्रसाद,तर विद्यार्थी गुणगौरव व मान्यवरांचा सत्कार सोहळा तसेच स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण रांगोळी स्पर्धा (प्रत्येकांच्या घरा व दारासमोर) तसेच सायं. ठिक ५ वाजता श्रींची भव्य मिरवणूक व पालखी सोहळा असे धार्मिक आणि आध्यात्मिक तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन श्री गणपती ट्रस्ट घोसाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close