नाईक-अंतुले महाविद्यालयात स्कुल कनेक्ट एन.इ.पी.अभियानाची यशस्वी अमंलबजावणी…… 

[avatar]

नाईक-अंतुले महाविद्यालयात स्कुल कनेक्ट एन.इ.पी.अभियानाची यशस्वी अमंलबजावणी……

सर्फराज दर्जी:बोर्ली पंचतन (रायगड)तालुक्यातील शेवटच्या झोपडीतील शेवटच्या व्यक्ती पर्यंत उच्चशिक्षण* हे बँरिस्टर ए.आर.अंतुले साहेबांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात पुर्ण करण्यासाठी म्हसळा येथील वसंतराव नाईक कला,वाणिज्य आणि बँरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयामध्ये मा.श्री. मुश्ताक अंतुले साहेब (अध्यक्ष कोकण उन्नती मित्र मंडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने नवनवीन उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात येत असते या उपक्रमांचा एक भाग म्हणुन महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार उच्च शिक्षणातील स्थुल नोंदणी प्रमाण वाढविणे या उद्देशाने सुरू केलेल्या स्कुल कनेक्ट एन.इ.पी. अभियान महाविद्यालयातर्फे राबविण्यात येत आहे या अभियानांतर्गत महाविद्यालयातील एन.ई.पी.समन्वयक प्रा.श्री.शिरीष समेळ, त्याचबरोबर वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. श्री.जगदीश शिगवण, गणित विषयाचे प्राध्यापक श्री.फहिम मन्सुरी, भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक श्री.राजेंद्र हालोर, अकौन्टन्सी विषयाचे प्रा.श्री.सुमित चव्हाण याची एक समिती तालुक्यातील प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन नवीन शैक्षणिक धोरण२०२० मधील विद्यार्थी केंद्री बदलांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देते त्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामुळे २०२४-२०२५ मधील प्रवेश प्रकियेत होणारा बदल,मल्टीपल इन्ट्री मल्टीपल एक्झिट पध्दत म्हणजे काय?, एक समान क्रेडिट पध्दत,बहुशाखीय लवचिक अभ्यासक्रम आणि विषय निवड पध्दत, नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अमंलबजावणी साठी महाविद्यालयामध्ये झालेले आणि होणारे बदल,डिजिटल लाँकर आणि एबीसी आयडी यांचे नवीन शैक्षणिक धोरणातील महत्व, कौशल्य विकासासाठी आयोजित करण्यात येणारे विविध कोर्सेस,नवीन श्रेय्यांक पध्दत, विविध शिष्यवृत्ती योजना इन्डीयन नाँलेज सिस्टीम,स्वयंम या संस्थेचे आँनलाईन अभ्यासक्रम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणाची यथायोग्य माहिती देवून विद्यार्थ्यांच्या मनातील शंका दुर करण्याचा प्रयत्न करतात.तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या मनात सिनियर काँलेजबाबत असणारे मानसिक दडपण दुर करण्यासाठी “सिनिअर काँलेजची सहल” या उपक्रमांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सिनियर काँलेजच्या भेटीसाठी निमंत्रित करुन त्यांना राष्ट्रीय मुल्याकंन संस्थेकडुन नँकचे मुल्याकंन झाले असुन महाविद्यालयाला बी प्लस प्लस श्रेणी प्राप्त झालेली आहे तसेच एन.आय.आर.एफ. या मुल्याकंन प्रक्रियेत काँलेज नोंदणीकृत झालेले आहे. महाविद्यालयाचे ग्रीन आँडिट,अकँडेमिक आँडिट, एनर्जी आँडिट झालेले आहे याबाबत माहिती देतात त्याचबरोबर कोकण उन्नती मित्र मंडळ मुंबई या संस्थेच्या माध्यमातून आणि मा.मुश्ताक अंतुले साहेब यांच्या प्रयत्नातून महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात ? याबाबत माहिती सांगितली जाते.तसेच उच्च शिक्षण आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवायोजना विभाग ,डि.एल.ई.विभाग यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात कोणता बदल होऊ शकतो? रोजगाराची क्षमता निर्माण करण्यात उच्च शिक्षणाचे महत्त्व काय असते? उच्च शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य विकास कसा साध्य करता येतो? याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले जाते. स्कुल कनेक्ट आभियाना बाबत आपले मत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.दिगंबर टेकळे म्हणाले कि, “स्कुल कनेक्ट एन.इ.पी. अभियानांतर्गत आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांची एक टिम तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयानां भेटी देऊन नवीन शैक्षणिक धोरणातील विद्यार्थी केंद्रित बदल विद्यार्थ्यांना देते.आतापर्यंत आम्ही तालुक्यातील सुमारे ६०० विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यामध्ये यशस्वी झालो असुन अजूनही तालुक्यातील उर्वरित कनिष्ठ महाविद्यालयां बरोबर आमचा संपर्क चालु असुन आभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाणे आणि उच्च माध्यमिक परीक्षा उतीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आम्ही या अभियानांतर्गत करणार आहोत.”बँरिस्टर साहेबांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या या अभियानाबाबत महाविद्यालय विकास समितीचे सन्मानिय सदस्य मा.श्री.अशोक तळवटकर साहेब, मा.श्री. फजल हळदे साहेब,मा.श्री.महादेव पाटील साहेब,मा.श्रीमती निलम वेटकोळी मँडम यांनी समाधान व्यक्त केले असुन अभियानामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close