बनावट सातबारा तयार करून जमिनीची परस्पर विक्री तलाठ्यासह दोघांवर गुन्हा दाखल……. 

[avatar]

बनावट सातबारा तयार करून जमिनीची परस्पर विक्री तलाठ्यासह दोघांवर गुन्हा दाखल…….

रोहा :समीर बामुगडे

कोलाड कुडली सजा हद्दीत मूळ जमीनमालकाला अंधारात ठेवून बोगस बनावट 7/12 तयार करून तलाठ्याने दोन स्थानिक दलालांना सोबत घेत लाखो रुपये किमतीची जमीन तिऱ्हाईत व्यक्‍तीला विकल्याचा चा धक्कादायक प्रकार घडला आहे.
फिर्यादी (रा. पुणे) यांच्या मालकीची कुडली भागात जमीन आहे.६ जून २०२१ रोजी तत्कालीन तलाठी यांनी दोन्ही दलाल (रा.धगडवाडी, रोहा) यांना हाताशी धरून बनावट सात बारा तयार केला.
आणि ९-९५-०० हेक्‍टरपैकी काही जमीन परस्पर जमीन घेणाऱ्या (रा. रोहा) यांना विकली.
हा प्रकार जमीनमालक यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली.आर्थिक गुन्हे विभागाने चौकशी करून तत्कालीन तलाठ्यासह दोन आरोपी विरोधात कोलाड पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ३०) तक्रार दाखल केली.तर पोलिसांनी तलाठ्यांसह दोन्ही बंधूं रा.धगडवाडी कोलाड विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कोलाड पोलीस ठाणे येथे गु.र.नं.06/2024 भा.दं.वि.क.420, 465, 467, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि नितिन मोहिते यांनी घटनास्थळी पाहणी केली असून,
अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा रायगड अलिबाग मार्फत व्ही डी.शिद हे करीत आहेत.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close