रोशन चाफेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा मधील 700 नागरिकांना 5 लाखांचा विमा कार्ड वाटप तसेच विविध कार्यक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा……. 

[avatar]

रोशन चाफेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा मधील 700 नागरिकांना 5 लाखांचा विमा कार्ड वाटप तसेच विविध कार्यक्रमांनी वाढदिवस उत्साहात साजरा…….

रोहा(संतोष सातपुते) भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगडचे जिल्हा सरचिटणीस तथा सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक रोशन चाफेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दिनांक 24 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत विविध ठिकाणी व संपर्क कार्यालयात आयुष्यमान भारत व उद्यम कार्ड या योजनांचे शिबीर राबविण्यात आले होते तर तब्बल 700 नागरिकांनी योजनेअंतर्गत लाभ घेतला . याच
७०० लाभार्थीना रोहा शहरातील टाऊन हॉल समोरील मैदानात गुरुवारी दि. ( १ ) रोजी आयुष्यमान भारत व उद्यम कार्ड वाटप करून रोशन चाफेकर यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात यावेळी साजरा केला.
सदर कार्यक्रम रायगड लोकसभा प्रमुख सतिशजी धारप, दक्षिण रायगड भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाने तसेच रोहा तालुका अध्यक्ष अमितजी घाग यांच्या सहकार्याने पार पडला. कार्यक्रमस्थळी राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील तसेच विविध पक्षातील मान्यवरांनी यावेळी भेट देऊन शुभेच्छा साठी भेट देण्यात आली.
यावेळी रायगड लोकसभा विस्तार रमेश ढेबे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, रोहा तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकुर,रोहा तालुका भाजप उपाध्यक्ष रविंद्र तारू, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस जयश्री भांड,रोहा तालुका महिला मोर्चा अध्यक्ष अपर्णा सुटे,कामगार आघाडी नेते विलास डाके, निलेश धुमाळ, सनील इंगावले, ज्योती सनलकुमार, धनश्री बापट, मिलिंद झुरे, विज्ञान सर, रोहा प्रेस क्लब माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव, रविंद्र कान्हेकर, सचिन साळुंके, महेंद्र मोरे, उद्धव आव्हाड,संतोष सातपुते, जितेंद्र जाधव, रामनरेश कुशवाह, राष्ट्रवादी काँग्रेस मा. नगरसेवक महेश कोल्हटकर, मयूर दिवेकर,शिवसेना रोठ बुद्रुक ग्रामपंचायत सदस्या वैभवी भगत, राजेश भगत,सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान अध्यक्ष किरण कानडे, सचिव हाजी कोठारी, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा सरचिटणीस विनीत वाकडे, भाजप महिला जिल्हा चिटणीस श्रद्धा घाग, रोहा सिटी फ्लॉवरचे सुरेंद्र निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ केंडे,रविंद्र बावदाने,संदेश विचारे, शिवव्याख्याते प्रतिक पाटणकर यांनी भेटुन शुभेच्छा दिल्या.

आमदार प्रशांत ठाकुर, दक्षिण रायगड भाजपा जिल्हा अध्यक्ष मा.आमदार धैर्यशील पाटील, मा. आमदार अवधूत तटकरे यांनी संपर्क करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

सदर शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी वैभव कुळकर्णी, रिया कासार, अनिल घरजाळे, कृष्णा गोमतांडेल, राहुल, परेश चितळकर, कुणाल आंबळे यांनी विशेष मेहनत घेतली. त्याचप्रमाणे काफरे ताई,छाया बर्गे, राजश्री पाटील, प्रज्योती मयेकर, उकडे ताई, नेहा सपकाळ या महिला भगिनींनी सदर कार्यक्रमात सामाजिक भावनेने विशेष साथ दिली. तर आगामी काळात विविध योजना रोहेकरासाठी आम्ही घेऊन येणार आहोत,व सदर वाढदिवस हा माझ्या जीवनातील महत्वाचा क्षण ठरला असे रोशन चाफेकर यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close