इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशन सार्वत्रिक निवडणूक संपन्न.. अलिबाग च्या निलेश पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड….. 

[avatar]

इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशन सार्वत्रिक निवडणूक संपन्न.. अलिबाग च्या निलेश पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड…..
अलिबाग (रत्नाकर पाटील ) : इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशन द्वीवार्षिक सार्वत्रिक पेण रायगड जिल्हा निवडणूक २०२४-२०२६, शनिवार दि. ३ रोजी रोहा येथील ग्रीन ब्लॉसम रिसॉर्ट सुतारवाडी येथे निवडणूक संपन्न झाली. निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी निवडणूक अधिकारी राजेश सानप यांनी घेतली असून सुमारे ६५ सभासदांमधून निवडणूक सर्वानुमते बिनविरोध झाली.

निवडणुकीत अलिबागचे निलेश पाटील अध्यक्ष, कर्जतचे भालचंद्र जोशी सचिव, रोह्यातील कार्याध्यक्ष राजेश सानप, खालापूरचे खजिनदार शिवराम जंगम, पनवेल डिव्हिजन उपाध्यक्ष पि.एन.हिरेमठ, अलिबाग डिव्हिजन उपाध्यक्ष दिनानाथ पाटील, रोहा डिव्हिजन उपाध्यक्ष यदुराम धुमाळ, गोरेगाव डिव्हिजन उपाध्यक्ष अभिजीत जाधव, सह सचिव रामदास घरत यांची निवड बिनविरोध करण्यात आली.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close