नागोठणे जि.प. गट व पं.स. गणातून भाजपाचा उमेदवार निवडून आणणार – प्रल्हाद पारंगे…..विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हाती भाजपाचा कमळ……. 

[avatar]

नागोठणे जि.प. गट व पं.स. गणातून भाजपाचा उमेदवार निवडून आणणार – प्रल्हाद पारंगे…..विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हाती भाजपाचा कमळ…….

नागोठणे( महेंद्र माने) येथील विभागातील मनसे रोजगार स्वयंरोजगार विभाग,रायगड जिल्हा संघटक प्रल्हाद पारंगे,मनसे नागोठणे उपशहराध्यक्ष पवन जगताप, प्रसिद्ध वकील ॲड. रमेश जाधव यांच्यासह गणेश घाग,सुदर्शन कोटकर,चंदन मोरे,सचिन नेरपगार यांनी भाजपाच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेऊन भाजपा दक्षिण रायगड उपाध्यक्ष सोपान जांबेकर,भाजपा पेण विधानसभा अध्यक्ष प्रसाद भोईर, भाजपा रोहा तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकुर व आनंद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार 03 फेब्रुवारी रोजी भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष मा. आ. धैर्यशील पाटील यांच्या हस्ते त्यांच्या पेण वाक्रुळ येथील निवासस्थानी कमळ हाती घेत भाजपात प्रवेश केला.त्यावेळी नागोठणे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातून भाजपाचा उमेदवार निवडून आणणार असल्याचे प्रल्हाद पारंगे यांनी पत्रकारांना सांगितले.

पक्ष प्रवेशकर्ते प्रल्हाद पारंगे यांनी पत्रकारांना अधिक माहिती देताना सांगितले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेऊन आज मी भाजपात प्रवेश केला आहे. मी आधीच्या पक्षात ज्या प्रमाणे जन हिताची कामे करीत होतो त्याच्या पेक्षा जास्त जोमाने व उत्साहाने भाजपा पक्षाचे काम करेन तसेच आगामी काळात येणार्‍या प्रत्येक निवडणूक तन मन धनाने कामे करणार असल्याचे सांगून आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत नागोठणे गट तसेच नागोठणे विभागातून पंचायत समिती गणातून भाजपाचे उमेदवार निश्चितच निवडून आणणार असल्याचा विश्वास शेवटी व्यक्त केला. यावेळी भाजपा शिक्षण सेल रोहा तालुकाध्यक्ष अशोक अहिरे, भाजपा शिक्षण सेल रोहा तालुका उपाध्यक्ष धनराज उमाळे,भाजपा रोहा तालुका महिला अध्यक्षा अपर्णा सुटे,रोहा तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे यांच्यासह विठोबा माळी,सुदेश येरुणकर,मोरेश्वर म्हात्रे,अंकुश सुटे,मकरंद गडकरी तसेच नागोठणे विभागातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close