मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयात मुलींसाठी “आरोग्य तपासणी शिबीर”…… 

[avatar]

मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा महाविद्यालयात मुलींसाठी “आरोग्य तपासणी शिबीर”……

कोर्लई(राजीव नेवासेकर)मुरुडच्या अंजुमन इस्लाम जंजिरा विज्ञान पदवी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जीवशास्त्र विभाग आणि शासकीय ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्तविद्यमाने प्राचार्य डॉ.साजिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील मुलींसाठी “आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.
या शिबिरासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय, मुरुड येथून आलेल्या डॉ. नेहा शेळके व त्यांच्या टीमचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साजिद शेख यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या शिबिरामध्ये शंभर विद्यार्थिनींची रक्त तपासणी यामध्ये विद्यार्थिनींचे रक्तगट, हेमोग्लोबिन पातळी, संपूर्ण रक्त गणना (CBC) व बॉडी मास इंडेक्सची तपासणी करण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. नितीन पवार, जीवशात्र विभाग प्रमुख प्रा.जाविद खान तसेच अमरीन छापेकर, रोजमीन कासकर, फातिमा सुर्वे, आयेशा देशमुख, मोहम्मद कैफ कादिरी विद्यार्थ्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close