राष्ट्रीय स्पर्धेत वीर तायक्वांदो असोसिएशन ऑफ पनवेलचे खेळाडू करणार महाराष्ट्र चे प्रतिनिधित्व……. 

[avatar]

राष्ट्रीय स्पर्धेत वीर तायक्वांदो असोसिएशन ऑफ पनवेलचे खेळाडू करणार महाराष्ट्र चे प्रतिनिधित्व…….

पनवेल(विशेष प्रतिनिधी) राज्यस्तरीय स्पर्धेत भरघोस यश मिळवून वीर तायक्वांदो असोसिएशन ऑफ पनवेलचे खेळाडू जयपूर, राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघांचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती वीर तायक्वांदो असोसिएशनचे सेक्रेटरी संजय भोईर उपाध्यक्ष हेमंत कोळी यांनी दिली आहे

३२ वी महाराष्ट्र राज्य तायक्वादो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आयोजित नमो चषक दि. २७ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे पार पाडण्यात आली.
या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू जयपुर, राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेमध्ये वीर तायक्वादो असोसिएशन ऑफ पनवेलच्या सब-जुनिअर, कॅडेट, ज्युनियर अशा विविध गटातील खेळाडूंचा सहभाग असून अनुक्रमे आयुष अभिजीत कदम सब – जुनिअर U -41 , मुस्तफा शेख जूनियर U -51, निहाल संजय भोईर U -73 यांस सुवर्णपदक तसेच खंतेश बाळाराम वासकर U – 48, श्रीजय हरेश्वर भगत U -69 यांनी रजत पदक व तेजल सुहास लाहोटी कॅडेट U -43 हिने कास्य पदक प्राप्त करून स्पर्धेत भरघोस यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये अपूर्वा देसाई, हुसेन शेख, आयान शेख यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे पदाधिकारी (TAM) अध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओंबासे खजिनदार डॉ प्रसाद कुलकर्णी सीईओ गफार पठाण तसेच रायगड जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा भगत, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष तसेच वीर तायक्वांदो असोसिएशनचे सेक्रेटरी संजय भोईर, अध्यक्ष हरेश्वर भगत उपाध्यक्ष हेमंत कोळी, खजिनदार संदीप भगत निखिल भोईर, गणेश शिंदे, प्रशिक्षक, खेळाडू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close