चिकणी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा संपन्न….सचिन कळसकर यांच्या संकल्पनेतून साकारले शिव स्मारक…… 

[avatar]

चिकणी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळा संपन्न….सचिन कळसकर यांच्या संकल्पनेतून साकारले शिव स्मारक……

नागोठणे(महेंद्र माने) रोहा तालुक्यातील चिकणी येथील सचिन श्रीरंग कळसकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे लोकार्पण सोहळा शनिवार 03 फेब्रुवारी रोजी चिकणी येथील छ.शिवाजी महाराज चौकात संपन्न झाला.

या ऐतिहासिक सोहळ्या निमित्त शुक्रवार 02 फेब्रुवारी रोजी चिकणी गावातून छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची वाजत गाजत भव्य मिरवणुक काढण्यात आली. सचिन कळसकर यांच्या संकल्पनेतून तसेच लोकवर्गणीतुन साकारलेल्या या स्मारकाची उभारणी झाली असून यासाठी सचिन कळसकर, बाळकृष्ण देवरे, सतिश विजय देवरे यांच्या देखरेखेखाली व मार्गदर्शन लाभले असून यासाठी विश्वनाथ देवरे, मच्छिंद्र देवरे, विराजू देवरे, संतोष शिंदे, मंगेश देवरे, गणेश देवरे,सुनिल देवरे यांचे अनमोल सहकार्य लाभलेल्या या स्मारकाचे लोकार्पण शनिवार 03 फेब्रुवारी रोजी सकाळी सकाळी 09.00 ते 11.00 वा.गणेश पूजन व कलश – गंगा पूजन, स्थळ शुध्दीकरण, अभिषेक तसेच प्राणप्रतिष्ठान 11.30 वा.दरम्यान मारुती देवरे, रमेश देवरे, राजाराम देवरे, दिपक देवरे,किसन देवरे, नरेश देवरे,विठ्ठल देवरे,लक्ष्मण भोसले, श्रीरंग देवरे, शंकर चव्हाण, अशोक भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 11.45 वा. मान्यवरांच्या हस्ते महा आरती, दुपारी 12.00 ते 2.00 पर्यंत कडसुरे येथील तायडे यांच्या आखाडाचा शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिक,सायंकाळी 06.00 ते 08.00 पर्यंत शिवशाहिर वैभव घरत यांचा मराठमोळा पोवाड्याचा कार्यक्रम,08.00 वा.स्नेहभोजनानंतर सुनिल देवरे यांच्या शिवाजी महाराजांच्या जीवनावरील मनोगताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी सदानंद गायकर, मधुकर ठमके, संतोष कोळी,अतुल काळे,विक्रम फडतरे, अंकुश ताडकर यांच्यासह नागोठणे विभाग व चिकणी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे पौरोहित्य धनंजय गद्रे यांनी केले तर सूत्रसंचालन पुंडलिक ताडकर यांनी केले.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close