मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमीत्त लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठानच्या वतिने ‘आमदार चषक’ कबड्डी(पुरुष) खुल्या स्पर्धा”आपला सहभाग आजच नोंदवा”……. 

[avatar]

मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमीत्त लोकनेते अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठानच्या वतिने ‘आमदार चषक’ कबड्डी(पुरुष) खुल्या स्पर्धा”आपला सहभाग आजच नोंदवा”…….

उतेखोल / माणगांव( रविंद्र कुवेसकर )माणगांवकरांचे श्रध्दास्थान कार्यसम्राट लोकनेते कै.अशोकदादा साबळे यांच्या नावे कार्यरत स्मृती प्रतिष्ठानने आपली सामाजिक बांधिलकी जोपासत प्रतिष्ठान संस्थापक तथा शिवसेना नेते ॲड.राजीव साबळे यांच्या मार्गदर्शनात लोकप्रिय आमदार भरतशेट गोगावले यांच्या संकल्पनेतून दि.९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्ताने प्रतिष्ठान अध्यक्ष अरुण क्षिरसागर यांचे नेतृत्वात कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांचे सहभागाने माणगांव येथिल साबळे विद्यालयाचे भव्य पटांगणात दि.१० व ११ फेब्रुवारी २०२४रोजी सायंकाळी मॅटवरील खुल्या (पुरुष) तालुका व जिल्हा स्तरीय खास ‘आमदार चषक’ कब्बड्डी स्पर्धांचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत जिल्हा व तालुका स्तरीय कब्बडी संघ स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतिने जाहीर आवाहन केले आहे. या भव्य स्पर्धांचे खास उद्घाटन राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह तथा शेकाप नेते ॲड. आस्वाद पाटील यांचे शुभहस्ते माणगांवचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार व शिवसेना ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समिर शेडगे व कृ.उ.बा. समिती माणगांव सभापती रमेश मोरे आणि शिवसेना महिला संघटक सौ. शर्मिला सुर्वे, प्रतिष्ठान महिला अध्यक्षा सौ. सुवर्णा जाधव यांच्या उपस्थितीत, तर या स्पर्धांचे बक्षिस वितरण दि.११ फेब्रुवारी रोजी खास महाड-पोलादपूर-माणगांवचे लोकप्रिय आमदार व शिवसेना शिंदे गट पक्ष प्रतोद आम.भरतशेट गोगावले यांचे शुभहस्ते व उपनगराध्यक्ष राजेश मेहता, शिवसेना तालुका प्रमुख ॲड.महेंद्र मानकर यांचे उपस्थितीत होणार आहे.
रविवार दि.११ फेब्रुवारी जिल्हास्तरीय स्पर्धेस पारितोषिके; प्रथम क्रमांक रुपये ५१०००/- व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ३१०००/- व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक २१०००/- व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक ११०००/- व आकर्षक चषक, सर्वोत्कृष्ट खेळाडू ५०००/- व आकर्षक चषक, उत्कृष्ट पकड ३०००/- व आकर्षक चषक, उत्कृष्ट चढाई-पट्टू ३०००/- व आकर्षक चषक तसेच
“शनिवार दि.१० फेब्रुवारी तालुकास्तरीय स्पर्धा पारितोषिके; प्रथम क्रमांक २१,०००/- व आकर्षक चषक, द्वितीय क्र. १५,०००/- व आकर्षक चषक तृतीय क्रमांक ११,०००/- व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक ७,०००/- व आकर्षक चषक, सर्वोत्कृष्ट खेळाडु ३,०००/- व आकर्षक चषक, उत्कृष्ट पकड २,०००/- व आकर्षक चषक, उत्कृष्ट चढाईपट्टू २,०००/- आकर्षक चषक, या खुल्या (पुरुष)कब्बडी स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी प्रतिष्ठानने, समाधान उतेकर ७५५९४९७०९४, सिद्धेश पिंगळे ९२७२३०५२७७, प्रसाद धारीया ९९२२२१८३२३, राजेंद्र सुर्वे ९३५६३४३३०६ यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यास क्रिडा प्रशिक्षकांचे सहकार्य लाभणार असुन आयोजक जोरदार तयारीला लागले असल्याची माहिती दिली आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close