जल पासून जीवन वंचित, धोत्रेवाडी ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही तर हंडा मोर्चा निघेल, जयवंती हिंदोळा यांचा इशारा, धोत्रेवाडी पाणी प्रश्न चिघळण्याच्या मार्गावर, ग्रामपंचायतीची भूमिका अस्पष्ट…….. 

[avatar]

जल पासून जीवन वंचित, धोत्रेवाडी ग्रामस्थांना पाणी मिळाले नाही तर हंडा मोर्चा निघेल, जयवंती हिंदोळा यांचा इशारा, धोत्रेवाडी पाणी प्रश्न चिघळण्याच्या मार्गावर, ग्रामपंचायतीची भूमिका अस्पष्ट……..

गणेश पवार कर्जत

कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या धोत्रेवाडी येथे पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. जलजीवन मिशन योजना पूर्ण झालेली असताना धोत्रेवाडी येथील आदिवासी कुटुंबाना पाणी मिळाले नाही. तर धोत्रे गावाकडून विरोध होत असल्याने आदिवासी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या सगळ्यात महत्वाची असलेली पाथरज ग्रामपंचायतीची भूमिका अस्पष्ट असल्याने परकं चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान धोत्रेवाडीला पाणी मिळाले नाही तर आता थेट आदिवासी कुटुंबांसह हंडा मोर्चा काढू असा इशारा माजी पंचायत समिती उपसभापती जयवंती हिंदोळा यांनी दिला आहे. तेव्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. येथील भौगोलिक भाग हा डोंगर, दुर्गम भाग आहे. तर या भागात आदिवासी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. याच तालुक्याचा एका टोकाला पाथरज ग्रामपंचायत हद्दीत धोत्रे गाव व वाडीसाठी तब्बल ८१ लाख रुपयांची जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाणी योजना मंजूर झाली होती. हि योजना एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण देखील झाली. धोत्रे व धोत्रेवाडी गावात पाण्याची टाकी, पाईपलाईन टाकण्यात आली. धोत्रे गावात या योजनेचे पाणी पोहचले देखील मात्र धोत्रेवाडीत वर्षभरात केवळ दोनच वेळा पाणी मिळाले. तर गावात ठेकेदाराकडून टाकीचे बांधकाम झाले पाईपलाईन नळ आदी काम पूर्ण झाल्यानंतर पाणी येईल या ग्रामस्थांचा आशा आता मावळल्या असून त्याविरोधात ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत.
धोत्रेवाडी हि दोन वाड्यांची मिळून बनलेली आहे. दोन्ही वाड्यांची मिळून साधारण येथे ८५ घरे असून ३०० च्यवर लोकसंख्या आहे. तर वाडीत एक रायगड जिल्हा परिषदेची शाळा असून तिथेही विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छतागृहात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. वाडीत एकूण ४ विहरी आहेत. त्यापैकी २ विहरी मालकीच्या आहेत. पण या सर्व विहरींची पाणी पातळी आताच खालावली असून केवळ पुढचा महिना जेमतेम या विहरींवर निघणार आहे. अशात वाडीत पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तर वाडीत पाण्याची टाकी असताना पाणी का मिळत नाही असा प्रश्न ग्रामस्थ विचारात आहेत.
याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर धोत्रे गावात पाण्यासाठी ग्रामपंचायतीकडून बैठक लावण्यात आली मात्र या बैठकीत वाडीला पाणी द्यायचं नाही अशी भूमिका धोत्रे ग्रामस्थांनी घेतल्याचे वाडीतील ग्रामस्थ सांगत आहेत. तर शासनाची योजना असताना यात पाथरज ग्रामपंचायत मात्र भूमिका स्पष्ट करू शकली नसल्याने गावात वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही आदिवासी आहोत म्हणून आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवले आहे का ? असा जळजळीत प्रश्न धोत्रेवाडी ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. तर पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयवंती हिंदोळा यांनी देखील धोत्रेवाडी ग्रामस्थांना पाणी मिळाले पाहिजे हि भूमिका घेतली आहे. तर ग्रामस्थांनी दिनांक ५ फेब्रुवारी रोजी कर्जत तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती येथे भेट देऊन याबाबत निवेदन सादर केले आहे. यानुसार धोत्रे गाव व दोन्ही वडीसाठी ८१ लाखाची पाणी योजना आली असताना आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. तर आता प्रशासनाने यात हस्तक्षेप करून आम्हाला हक्काचे पाणी मिळवून द्यावे अन्यथा मुलाबाळांसह आम्ही हंडा मोर्चा काढू असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान ग्रामपंचायत पाथरज यांनी अंगकाढूपणा केल्याने ग्रामस्थांनी वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागितली आहे. तेव्हा तलसीलदार कर्जत व गटविकास अधिकारी हे धोत्रेवाडीबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर धोत्रेवाडी ग्रामस्थांना पाणी मिळणार कि हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करत मोर्चा काढावा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धोत्रेवाडी व धोत्रेगाव अशी जल जीवन मिशनची योजना असताना देखील वाडीला अद्याप पाणी मिळाले नाही. तर उन्हाळ्यात या महिलांची पाण्यासाठी मोठी पायपीट होते. आता येथील विहरीत मर्यादित पाणी साठा राहिला असल्याने महिलांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र योजना पूर्ण झाली असताना केवळ विरोध म्हणून त्यांना पाणी दिले जात नाही हे चुकीचे आहे. ८१ लक्ष रुपये योजनेसाठी शासनाने दिले कुणी एका व्यक्तीने नाही. त्यामुळे धोत्रेवाडीच नाही तर कुठल्याही नागरिकाला पाण्यासाठी वंचित ठेवता येत नाही. तेव्हा ग्रामस्थांच्या या लढ्यात त्यांना न्याय मिळेपर्यंत पुढे असेन

: जयवंती हिंदोळा, माजी उपसभापती, कर्जत पंचायत समिती….. 

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close