राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहा तालुका अध्यक्षा प्रतिम पाटील यांच्या उपस्थितीत कोलाड नाभिक समाजाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न…… 

[avatar]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहा तालुका अध्यक्षा प्रतिम पाटील यांच्या उपस्थितीत कोलाड नाभिक समाजाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न……

रोहा(संतोष सातपुते) कोलाड विभाग नाभिक तरुण मंडळाच्या वतीने सोमवार दि. ( ५ ) रोजी कोलाड येथील शिवनेरी मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात महिलांचे सौभाग्याचे लेण असलेले हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी कोलाड विभागातील नाभिक समाजातील असंख्य महिला उपस्थित होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहा तालुका अध्यक्ष प्रतिम ताई पाटील व सुनिता सुरेश महाबळे रोहा पंचायत समिती सभापती यांच्या शुभहस्ते सर्व महिलांना सौभाग्याचे हळदीकुंकू व वाण देण्याचे कार्यक्रम करण्यात आला.
उपस्थित नाभिक समाजाच्या महिलांना रोहा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष प्रतिम ताई पाटील मागदर्शन करताना सांगितले की, आज नाभिक समाजातील बांधव सामाजिक, शैक्षणिक, कला , क्रीडा,राजकीय या सर्व क्षेत्रात आपला पारंपरिक व्यवसाय सांभाळून काम करित आहेत. परंतु महिला देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या समाजातील महिला चुल आणि मुल सांभाळत प्रत्येक सामाजिक कार्यात सहभागी होताना दिसत आहेत याचा मला अभिमान आहे तसेच येणाऱ्या काळात सामाजिक किंवा वैयक्तिक महिलांच्या कोणत्याही समस्या असो या तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष म्हणून मी मंञी अदिती ताई तटकरे यांच्या माध्यमातून नक्की सोडविण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास प्रितम ताई पाटील यांनी कोलाड येथील हळदी कुंकू समारंभात दिला.

कोलाड पोलिस स्टेशनचे मुख्य अधिकारी नितीन मोहिते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून होते . तसेच नरेश जाधव, पाडसे मॅडम, गंजारे मॅडम , योगेश शिर्के , सचिन दिवेकर , रूपेश साळुंखे , मंगेश शिर्के , गजानन खराडे , सुधीर खराडे , रोहा तालुका अध्यक्ष प्रविण पवार, कोलाड विभागीय अध्यक्ष किशोर खंडागले, पत्रकार जितेंद्र जाधव , मगर साहेब, मनिषा मंगेश शिर्के. ॠतुजा रूपेश साळुंखे तळा, रिया शिर्के, वृषाली दिवेकर यासह नाभिक समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप भगत यांनी केले या वेळी महिलांचा खेळ पैठणीचा, तळ्यात मळ्यात , कोण नाही कोणचा आणि डाळ भात लोणचा, बलुन बॅलन्स , महिलांच्या हुकाणे यांच्या स्पर्धा व गेम्स घेऊन महिलांना प्रोत्साहित करण्यात आले .

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close