आमदार जयंतभाई पाटील यांच्या प्रयत्नातून जे. एस. एम. महाविद्यालयास आरसीएफकडून सोलर पॅनल भेट….. 

[avatar]

आमदार जयंतभाई पाटील यांच्या प्रयत्नातून जे. एस. एम. महाविद्यालयास आरसीएफकडून सोलर पॅनल भेट….. 

दिवसेंदिवस वाढणारी पर्यावरण पूरक जीवनशैलीची गरज लक्षात घेऊन व ऊर्जा बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन जे. एस. एम. महाविद्यालयाने आरसीएफ व्यवस्थापनाकडे केलेल्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत आरसीएफकडून जे. एस. एम. महाविद्यालयास २० केवी थ्री फेज सोलर पॅनल व इन्व्हर्टरकरिता १५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. माननीय आमदार जयंतभाई पाटील यांनी केलेल्या प्रयत्नातून आरसीएफने सीएसआर फंडातून हा निधी महाविद्यालयास उपलब्ध करून दिला आहे. सोलर पॅनल बसविण्याचे हे काम तीन टप्प्यात चालणार असून पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाची कार्यालयीन इमारत व विज्ञान विभागाच्या इमारतीच्या ऊर्जेची गरज भागविली जाणार आहे. दुसरा व तिसरा टप्पा पुढील एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे आश्वासन आरसीएफ व्यवस्थापनाकडून महाविद्यालयास देण्यात आले आहे. हे तीन टप्पे पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयासाठी लागणा-या संपूर्ण ऊर्जेची गरज सौर-उर्जेच्या माध्यमातून भागविली जाणार आहे. ऊर्जेची बचत व पर्यावरण रक्षण या दृष्टिने महाविद्यालयाने टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे.

आज महाविद्यालयाच्या प्रांगणात या सोलर पॅनलच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतमभाई पाटील तसेच आरसीएफ व्यवस्थापनातर्फे
श्री. अनिरुद्ध खाडिलकर (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर), श्री. संजीव हरळीकर (जनरल मॅनेजर एच. आर.), श्री. विनायक पाटील (डेप्युटी जनरल मॅनेजर एच.आर), श्री. संतोष वझे (सीनियर ऑफिसर पब्लिक रिलेशन्स), श्री. ए व्ही. लोणकर (माजी डायरेक्टर), श्री. डी. डी. माने (माजी जनरल मॅनेजर अकाउंट अँड फायनान्स, चेंबूर) आदी मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयास सोलर पॅनलकरिता निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतमभाई पाटील, उपाध्यक्ष मा. डॉ. साक्षी पाटील, सेक्रेटरी मा. श्री गौरव पाटील यांनी आरसीएफ युनिटचे आभार व्यक्त केले आहेत. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. सोनाली पाटील व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. अशोक जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा करून महाविद्यालयास हे सोलर पॅनल मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close