बुरुड समाज प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचा कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर संपन्न!शिबिरात समाजातील विधवा प्रथा आणि परंपरा बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय मंजूर……. 

[avatar]

बुरुड समाज प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचा कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर संपन्न!शिबिरात समाजातील विधवा प्रथा आणि परंपरा बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय मंजूर……. 

माणगांव /खर्डी खुर्द(महेश शेलार) कर्जत, अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान रजि. ठाणे या सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर दि.4 फब्रेवारी 2024 रोजी कर्जत जवळील सदानंद रिसॉर्ट येथे घेण्यात आला. यावेळी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील तसेच रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते या शिबिरात सहभागी झाले होते. महिला मध्यवर्तीय विभाग आणि रायगड जिल्ह्यातील महिला विभाग कार्यकर्त्याचीही ऊपस्थिती होती. सर्व प्रथम प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून दिपप्रज्वलन करण्यात आले, अनुक्रमे स्वामी केतेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, आणि माता जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. श्री गणेश वंदन करून बुरूड समाजातील दिवंगत विभूतींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच बुरूड समाज “प्रतिज्ञा” घेतली व तिचे सामुदायिक वाचन करण्यात आले.प्रस्थावनेत महासचिव प्रकाश माने यांनी उपस्थित कार्यकर्त्याना संस्थेच्या कार्या संबंधातील आणि ध्येय उद्दिष्ट धोरणातील बारकावे विस्त्रुतपणे सांगितले. यावेळी समाजवेचे पाच नियम सांगण्यात आले त्यासंबंधित सखोल मार्गदर्शन कार्यकारिणी सदस्य यांचे वतीने प्रकाश माने यांनी केले तसेच समाज हिताच्या व विकासाच्या योजनेबद्दल सखोल माहिती दिली.

सदर सभेत महत्वाचा प्रस्ताव मांडण्यात आला तो असा कि विधवा प्रथा बंद करण्यात यावी यावर मार्गदर्शन करणारे बोलले कि विधवा प्रथा तळा तालुक्यात सर्व प्रथम बंद करण्यात आली आहे व त्याची अंमलबजावणी हि चालू आहे. एकंदरीच पाहता पती मयत झाला कि त्याच्या पत्नीचे आभूषण काढले जातात, बांगड्या फोडल्या जातात, मंगळसूत्रे काढले जाते, पायातील जोडवी काढली जाते, कपाळावरील कुंकू पुसले जाते, हळदी कुंकू कार्यक्रमाला त्या महिलेला बोलावले जात नाही. असा जी. आर. सुद्धा महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे त्या अनुषगाने विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव ठेवण्यात आला व तो एक मतांनी मंजूर झाला. छत्रपती शिवाजी जन्माला यावा पण माझ्या घरात नाही, शेजारच्या घरात जन्माला यावा तर शिवाजी माझ्या घरात जन्माला यावा हे प्रत्येकाला वाटायला हवे तरच आपला महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश प्रगती पथावर येईल असे दिपाली दिलीप मोरे खोपोली यांनी सांगितले.या शिबिरास सदानंद गायकवाड, आबासाहेब पवार (अध्यक्ष), प्रकाश माने, संदीप नागे, डाॅ.अजय मोरे,गजानन नागे,राजेंद्र नागे,निलेश पवार, प्रशांत करमत, गणेश वडतीले, उमाजी माडेकर, संदीप जामकर, उल्का माडेकर, ज्योती माने, अनिता पवार, स्नेहल नागे, रेश्मा सोंडकर, सुनिता सावंत, श्रुती वाडेकर, शिवाजी कोरडे, सौ.अंकिता मोरे, दिपक गायकवाड, तुषार सोंडकर, सूर्यकांत सोंडकर, राजू सुरवसे, विकास सावंत, गणेश मोरे, दिलीप मोरे, राकेश किल्लेकर, किशोर गायकवाड, कल्पेश खैरे, सुरेंद्र सोनकर, दर्शन पवार, अशोक पवार, सागर सूर्यवंशी, दिपिका गायकवाड, प्राची किल्लेकर, आरती सूर्यवंशी, सुरेखा सोनकर, शितल नागे, दिपाली मोरे, रुपेश मोहिते, रूपाली मोहिते, सौ.रुख्मिणी कोरडे, विजय कोरडे, सौ.अंकिता मोरे, भरत पवार, निलेश नागे, दर्शन पवार, सागर सुर्यवंशी, शिवाजी कोरडे, अनिल वारलेकर, मधुकर सोंडकर, सौ.सोनू माडेकर, गणेश वर्तले, अरुण मोरे महिला विभाग कार्यक्रमात हळदी कुंकू सोहळ्यात उपस्थित महिलांनी तिळगूळ, वाण सोबत आनंद ही लुटला. मार्गदर्शन शिबिर, विधवा प्रथा बंद करणे, अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान २०२४ दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. असे मोठ्या दिमाखात हा कार्यक्रम पार पडला. सुग्रास भोजनानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांचा आदराने निरोप घेतला.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close