जिद्द, चिकाटीच्या जोरावर तेजसने केले आई – वडिलांचे स्वप्न साकार…….. 

[avatar]

जिद्द, चिकाटीच्या जोरावर तेजसने केले आई – वडिलांचे स्वप्न साकार……..

माणगांव / खर्डी खुर्द(महेश शेलार) माणगांव तालुक्यातील खर्डी खुर्द येथील गरीब घराण्यातील तरुण कु. तेजस गणेश दवंडे हा एस. आर. पी. एफ. मध्ये गेली 9 महिने ट्रेनिग घेत होता. त्याच्या मेहनतीला आज यश आले आहे. नुकताच तो एस. आर. पी. एफ. म्हणजे राज्य राखीव पोलीस दल या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपल्या घरी परतला त्यावेळी त्याचे आई – वडील आणि आजी आतुरतेने वाट पहात होते त्याला पाहताच त्यांचे मन भरून आले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्याच्या या जिद्द आणि चिकाटीमुळे गावातील इतर तरूनही उत्साहित झाले. गावातील तरुण तसेच ग्रामस्थ आणि मुंबईकर तरुण वर्ग यांनी एक छोटेखाणी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी तेजसने प्रथम आपले आई – वडील आणि आजीचे चरण स्पर्श केले नंतर गावातील मंदिरात जाऊन तिथेही दर्शन घेतले. त्यानंतर तरुण मित्र मंडळींनी केक कापून त्याचे दिमाखात स्वागत केले. यावेळी ग्रामस्थ, महिला, तरुण मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तेजस हा एक सामान्य कुटुंबातील मुलगा परंतु त्याने कोणत्याही गोष्टीमध्ये कधीही हार मानली नाही. त्याने याआधी मुंबई पोलीस भरतीसाठी प्रयत्न केले होते परंतू तिथे त्याला एक मार्कसाठी हार मानावी लागली. मुबंई पोलीस भरती मध्ये त्याला 117 मार्क्स हवे होते तिथे त्याला 116 मार्क्स पडले. तरीही तो खचला नाही त्याने जिद्द, चिकाटी सोडली नाही. लागलीच त्याने एस.आर.पी. एफ. ची ट्रेनिंग सुरु केली. रोज सकाळी पाच वाजता उठून खर्डी खुर्द ते ढालघर फाटा हा सात किमी चा प्रवास कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटात पार करायचा त्यामुळे त्याला जाणवू लागले की, आपण एक ना एक दिवस आपले स्वप्न साकार करू शकतो आणि ते त्याने करून दाखविले. ज्यावेळी तो ट्रेनिग पूर्ण करून गावाला आला त्यावेळी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग यांनी त्याचे जंगी स्वागत केला. यावेळी तेजसला विचारले असता त्याने स्पष्ट सांगितले की, माझ्याकडे दोन बॅग भरलेल्या होत्या त्या म्हणजे एक मुबंईमध्ये कुठेतरी प्रायव्हेट जॉब आणि दुसरी म्हणजे भरती त्याने त्याच्या आई – वडिलांना शब्द दिला होता की, मी तुमच्या समोर येईन तो दिवस म्हणजे माझ्या जीवनाचे सार्थक असेल. तुम्ही माझ्यासाठी आजपर्यंत जे काही काबाड कष्ट केले शेतात राब राब राबून चांगलं शिक्षण दिले त्याचे निश्चितच फळ भेटणार. एवढे बोलून त्याने अहोरात्र मेहनत घेऊन आई – वडिलांना दिलेल्या शब्दाचे पालन केले.

नुकताच तेजसचा खर्डी खुर्द येथे सत्कार समारंभ झाला त्यावेळी जुने जाणकार व्यक्तींनी सांगितले की, आम्हाला तुला यापुढे गगन भरारी घेताना बघायचे आहे. तू यापुढे असेच प्रयत्न करत रहा. तूला एका मोठ्या पदवीवर आम्हाला पहायचे आहे. आणि तू ते करू शकतोस. आपल्या गावाचे नावं साता समुद्रपलीकडे घेऊन जाऊ शकतोस. आपल्याच गावातील प्रफुल खेडेकर हा आर्मी मध्ये भरती झाला आहे त्यानंतर तू तुम्ही दोघांनी खरंच आपलं गावं नावारूपाला आणलं आहे. तुला तूझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close