काशीद-बिच समुद्रकिनारी मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू…… 

[avatar]

काशीद-बिच समुद्रकिनारी मुंबईतील तरुणाचा बुडून मृत्यू…… 

कोर्लई(राजीव नेवासेकर) पर्यटनात प्रसिद्ध असलेल्या मुरुड तालुक्यातील काशिद-बीच समुद्रात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण मुंबई-लोअर परेल येथून आपल्या मित्रांसोबत फिरायला आला होता.समुद्रात पोहण्यासाठी उतरला असता येथील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला.
मुंबई लोअर परेल येथे राहणाऱ्या दहा जणांचा ग्रुप मंगळवारी, (दि.28) मे रोजी सायंकाळच्या सुमारास काशिद समुद्रकिनारी फिरावयास आला
होता. येथे आल्यानंतर यातील काही जणांना समुद्रात पोहण्याचा मोह आवरला नाही. ते नवीन
जेट्टी विकसित होत असलेल्या भागात पोहण्यासाठी समुद्रात उतरले. मात्र, 17 वर्षीय
ऋषभ दास याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. यापैकी काही जण
कसेबसे पाण्याबाहेर निघाले, परंतु ऋषभ हा काही कळायच्या आतच पाण्यात बुडाला. त्याला
शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु काही तासानंतर तो सापडला. त्याला तात्काळ रुग्णालयात
दाखल करण्यात आले, परंतु, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काशीद येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांना
वाचवण्यासाठी निदान एक स्पीड बोट तैनात करावी, अशी मागणी असंख्य पर्यटकांनी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडे केली आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close