महाराष्ट्राचे राज्यपाल श्री .रमेश बैस यांच्याहस्ते कामगारनेते श्री दिनेश पाटील यांचा भव्य सत्कार…. 

[avatar]

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री .रमेश बैस यांच्याहस्ते कामगारनेते श्री दिनेश पाटील यांचा भव्य सत्कार….

जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाच्या ३५व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार समारंभात याप्रसंगी उपस्थित असलेले विशेष अतिथी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री रमेश बैस यांजकडून जवाहरलाल नेहरू पत्तन विश्वस्त मंडळ आणि प्राधिकरण मंडळावर सातत्याने वीस वर्षे कामगार विश्वस्त आणि सदस्य म्हणून कार्यरत राहून कामगारहिताबरोबरच औद्योगिक विकासाला चालना देत असलेले एकमेव कामगार नेते अशा शब्दांत गौरव करून प्रशासनाने श्री दिनेश पाटील यांना विशेष सन्मानचिन्ह प्रदान केले . सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या सत्कार सोहळ्यास दाद दिली.व्यासपीठावर जेएनपीएचे माजी अध्यक्ष श्री संजय शेठी, विद्यमान अध्यक्ष श्री उन्मेष वाघ आदी मान्यवर विराजमान होते. महाराष्ट्राचे राज्यपाल श्री .रमेश बैस यांनी जेएनपीएच्या सर्व अधिकारी आणि कामगार वर्ग तसेच या बंदराच्या कारभारामधील सर्व सहयोगीं उद्योजकांना शुभेच्छा देऊन हे प्राधिकरण देशाच्या विकासकामांमध्ये अग्रभागी राहील असा विश्वास व्यक्त केला .कामगार एकजुटीचा विजय असो.जेएनपीटी कामगार एकता संघटना.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close