न्यू इंग्लिश स्कूल शेणवई चा निकाल 100 टक्के… गार्गी पिसाट 75.80 टक्के गुण मिळवून शाळेमध्ये सर्वप्रथम….. 

[avatar]

न्यू इंग्लिश स्कूल शेणवई चा निकाल 100 टक्के… गार्गी पिसाट 75.80 टक्के गुण मिळवून शाळेमध्ये सर्वप्रथम…..

रोहा (संतोष सातपुते) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळा तर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी शालांत परीक्षेचा निकाल सोमवार दि. 27 मे 2024 जाहीर झाला या परीक्षेत रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील जे बी सावंत एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल शेणवई या विद्यालयाचा दहावी चा निकाल 100 टक्के लागला असून कु गार्गी पिसाट 75.80 टक्के गुण मिळवून शाळेमध्ये सर्वप्रथम आली द्वितीय क्रमांक कुमार श्री शेळके याला 73.60 टक्के मिळाले, तिसऱ्या क्रमांकावर कुमारी श्रेया सानप 72.60 टक्के गुण मिळाले, चतुर्थ क्रमांक सानवी देशमुख ला 72.40 टक्के मिळवून शाळेच्या यशात मनाचा तुरा रोवला आहे. या शाळेतून दहावी परीक्षे ला 11 विद्यार्थी बसले होते त्यामध्ये 8 मुले व 3 मुली चा समाविष्ट होता हे सर्व विद्यार्थी चागल्या गुणांनी उतीर्ण झाले आहेत. या वर्षी शाळेचा निकाल 100 टक्के लागल्या मुळे पालक वर्गा मध्ये व विद्यार्थ्यांन मध्ये आनंदाचे वातावरण असून विद्यार्थ्यांचे शाळेचे अध्यक्ष व्ही टी देशमुख, शाळेचे मुख्याध्यापक दडवे सर, सहाय्यक शिक्षक श्री जाधव सर,सौ उभारे मॅडम व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close