लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोमसाप नवीन पनवेल शाखेतर्फे एक कृतार्थ संध्याकाळ साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन….. 

[avatar]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोमसाप नवीन पनवेल शाखेतर्फे एक कृतार्थ संध्याकाळ साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन….. 

 
पनवेल(प्रतिनिधी)- लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने ‘एक कृतार्थ संध्याकाळ’ या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत कविसंमेलन, सन्मान पुरस्कार व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
          रविवार दिनांक २ जून २०२४ रोजी सायंकाळी ४.३०  वाजता विरूपाक्ष मंगल कार्यालय,अशोक बागेजवळ,ठाणा नाका,पनवेल येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर,कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी-साहित्यिक अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे,रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख प्रा.एल.बी. पाटील उपस्थित राहणार आहेत.
          या कार्यक्रमांतर्गत दुपारी २.३० ते ४.३० वाजेपर्यंत कविसंमेलन, यानंतर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात विविध क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल कर्तुत्वान व्यक्ती तसेच नवीन पनवेल,पनवेल,कर्जत,खोपोली, उरण येथील ज्येष्ठ साहित्यिकांना सन्मान पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कवी संमेलनात सहभागी होणाऱ्या कवींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हाने सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले आहे.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close