रोह्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपा आक्रमक….आव्हाडांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी तालुका अध्यक्ष अमित घाग व युवा मोर्चा चे रोशन चाफेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन…… 

[avatar]

रोह्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपा आक्रमक….आव्हाडांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी तालुका अध्यक्ष अमित घाग व युवा मोर्चा चे रोशन चाफेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन……

रोहा (संतोष सातपुते)राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे नेहमीच वादात दिसत असतात. त्यातच आता पुन्हा एका नव्या वादात ते अडकले आहेत. महाडच्या क्रांतीभुमीत मनुस्मृतीचे दहन करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फाडला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा चांगला आक्रमक झाला असून संविधानाचे शिल्पकार असलेले बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नसल्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाने संपुर्ण महाराष्ट्रमध्ये आंदोलन छेडले गेलेले आहे . याचाच एक भाग म्हणून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अपमान केल्या प्रकरणी रोशन चाफेकर जिल्हा युवा मोर्चा चे सरचिटणीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्या प्रमुख उपस्थित कार्यकर्त्यांसह रोहा नगरपालिकासमोर गुरुवार दि. ( ३० ) रोजी निषेध व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कोकणचे नेते मंत्री रविंद्रजी चव्हाण, आमदार प्रशांतदादा ठाकूर, आमदार रवीशेठ पाटील, जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील, मार्गदर्शक सतिशजी धारप, युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष राहुलभैया लोणीकर, विक्रांतजी पाटील, युवा मोर्चा महाराष्ट्र सरचिटणीस निखिल चव्हाण, दक्षिण रायगड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेशजी थोरे यांच्या मार्गदर्शना खाली दक्षिण रायगडमधील प्रत्येक तालुक्यात आंदोलने होणार आहे.
जितेंद्र आव्हाड हे स्वतःला विद्वान व थोर नेते समजतात. मात्र ते भान नसलेले, डोके ठिकाणावर नसलेली व्यक्ती आहे. कारण सदर फोटो फाडत असताना त्यांच्या कार्यकर्त्याने त्यांना जाणीव करून दिली कि ते बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडत आहे मात्र त्यांनी कोणालाही न जुमानता फोटो फाडले. त्यामुळे ते माफिस पात्र नाही.त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे रोशन चाफेकर यांनी सांगितले.
तसेच जितेंद्र आव्हाड हे मनोरुग्ण आहेत. ते नेहमीच स्टंटबाजी करण्यात मग्न असतात. संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणे हे जितेंद्र आव्हाड यांना महागात पडणार असुन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी असे अमित घाग यांनी मागणी केली.सदरचे निवेदन तहसीलदार किशोर देशमुख यांना देण्यात आले. तसेच रोहा पोलीस निरीक्षक देविदास मुपडे साहेब हे सुद्धा उपस्थित होते.
या आंदोलनावेळी कृष्णा बामणे (तालुका सरचिटणीस ), नरेश कोकरे ( युवा मोर्चा दक्षिण रायगड चिटणीस ), पी. व्ही.सनल कुमार ( दक्षिण भारत सेल जिल्हाध्यक्ष ),ज्येष्ठ नेते विपुल शाह,शैलेश रावकर (रोहा तालुका चिटणीस ), श्रद्धा घाग (दक्षिण रायगड चिटणीस ), रिया कासार (महिला मोर्चा तालुका सरचिटणीस ),वैभव कुळकर्णी (युवा वॉरिअर संयोजक दक्षिण रायगड ),सचिन मोरे,युवा मोर्चाचे अनिल घरजाळे,रितेश कीर्तने,संकेत देसाई,शुभम मोहिते,दिपक मोरे ( युवा मोर्चा रोहा मा. सरचिटणीस )रोहा तालुका आईटी सेल अध्यक्ष निखिल बोरोले, भरत ठाकरे, करण सोनावणे, रोहित सिंग यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जवाब जरूर दे 

महाराष्ट्रात नव्याने झालेली युती योग्य आहे का ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close